सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे 48 तास धोक्याचे
पश्चिम आणि उत्तर भारतात सायक्लोनिक सर्क्युलेशन स्थिती निर्माण झाली आहे. पुढचे 24 तास अत्यंत महत्त्वाचे आहेत. पाच सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झाले आहेत. त्यापैकी दोन पश्चिम बंगालच्या खाडीत किनारपट्टीजवळ आहेत. तर उर्वरित एक पाकिस्तान, दुसरं जम्मू-हिमाचल दरम्यान आहेत. मागच्या 24 तासात वातावरणात काही विशेष बदल झालेला नाही. मात्र पुढच्या 3 दिवसात 2 डिग्रीने तापमान घसरण्याची शक्यता आहे. पुढच्या सात दिवसांचे हवामान सांगताना हवामान तज्ज्ञांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.
advertisement
10 नोव्हेंबरपर्यंत पावसाचा मुक्काम
10 नोव्हेंबरपर्यंत महाराष्ट्रात अवकाळी पावसाचं संकट राहणार आहे. ५ नोव्हेंबर रोजी कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मेघगर्जना, वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस राहणार आहे. 6 नोव्हेंबर रोजी 30-40 किमी प्रति किमी वेगाने वारे वाहतील आणि मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह पाऊस राहील. ७ आणि ८ नोव्हेंबर रोजी हलक्या स्वरुपाचा पाऊस राहणार आहे. त्यानंतर पाऊस जाण्याची शक्यता आहे.
कोकणात पावसाचा जोर कायम
कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पुढील दोन दिवस विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाच्या कुलाबा वेधशाळेने वर्तवली आहे. 7 नोव्हेंबरपर्यंत राज्यात पाऊस सक्रिय राहण्याची शक्यता आहे. तर 5 नोव्हेंबरसाठी पाच जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्याला हवामान विभागाने 5 नोव्हेंबरसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. पुणे वगळता चारही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला असून या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मराठवाड्यात काय स्थिती
उत्तर महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यात पुढील दोन ते तीन दिवस हलक्या पावसाची शक्यता आहे. नंदुरबार, धुळे, नाशिक आणि जळगाव जिल्ह्यामध्येही तुरळक पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मराठवाड्यातील नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित परभणी, बीड, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.
ला निनाचं संकट
7 नोव्हेंबरपासून विदर्भ आणि मराठवाड्यात थंडीचं आगमन होऊ शकतं. तर मुंबई उपनगरातही पुढच्या दोन दिवसात तापमानात घट होण्याची शक्यता आहे. ला निनामुळे यावेळी मागच्या 25 वर्षांच्या तुलनेत सर्वात कमी तापमान राहील असा अंदाज वर्तवला जात आहे. डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान कडाक्याची थंडी राहणार आहे.
