TRENDING:

प्रचार संपण्याआधीच निवडणूक आयोगाचा नवा आदेश, सर्व राजकीय पक्षांना अलर्ट!

Last Updated:

राज्य निवडणूक आयोगाकडील नोंदणीकृत मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची महानगरपालिकेच्या निवडणुकांसंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: राज्यातील २९ महापालिका निवडणुकीसाठी आज प्रचाराचा अखेरचा दिवस आहे. संध्याकाळनंतर प्रचार तोफा थंडावणार आहे. त्यानंतर आता मतदानाची सर्वत्र तयारी सुरू झाली आहे. अशाच  राज्य निवडणूक आयोगाने एक पत्रक प्रसिद्ध केलं आहे. या पत्रकाच्या प्रसिद्धीपासून सर्व राजकीय पक्षांनी जाहिरातींवर बंदी घालण्यात आली आहे.
News18
News18
advertisement

राज्य निवडणूक आयोगाकडील नोंदणीकृत मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची महानगरपालिकेच्या निवडणुकांसंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी, महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या प्रचाराची मुदत १३ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता संपणार आहे. त्यामुळे  इलेक्ट्रॉनिक आणि मुद्रित माध्यमांसह अन्य कुठल्याही प्रसारमाध्यमांद्वारे निवडणूकविषयक जाहिराती प्रसिद्ध किंवा प्रसारित करता येणार नाहीत, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली आहे.

advertisement

महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होणार आहे. संबंधित अधिनियमातील तरतुदींनुसार मतदान समाप्तीच्या ४८ तास आधी म्हणजे १३ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता जाहीर प्रचाराची मुदत संपणार आहे. त्यानंतर प्रसारमाध्यमांतून कुठल्याही प्रकारची जाहिरात प्रसिद्ध अथवा प्रसारित करता येणार नाही. त्यामुळे जाहीर प्रचाराच्या समाप्तीनंतर मुद्रित माध्यमांच्या जाहिरातीच्या पूर्वप्रमाणनाचा किंवा परवानगीचा प्रश्न उद्भवत नाही. यासंदर्भातील सविस्तर बाबी राज्य निवडणूक आयोगाच्या ९ ऑक्टोबर २०२५ रोजीच्या निवडणुकांच्या प्रयोजनार्थ प्रसारमाध्यम संनियंत्रण आणि जाहिरात प्रमाणन आदेश २०२५ मध्ये नमूद केल्या आहेत.

advertisement

इच्छुक उमेदवारांना सुचना

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
तिळगुळ होणार नाहीत कडक, पाकात बनवा झटपट रेसिपी, संपूर्ण Video
सर्व पहा

तसंच, इच्छुक उमेदवाराचे नाव संबंधित महानगरपालिकेच्या मतदार यादीत असणे आवश्यक आहे; परंतु सूचक आणि अनुमोदकाचे नाव मात्र उमेदवार निवडणूक लढवत असलेल्याच प्रभागात असणे आवश्यक आहे. पक्षाच्या उमेदवारास आणि अपक्ष उमेदवारासही प्रत्येकी एक सूचक आणि एका अनुमोदकाची आवश्यकता असते. एखादा उमेदवार एकापेक्षा जास्त प्रभागात नामनिर्देशनपत्र भरून शकतात. परंतु, एका उमेदवारास एका प्रभागातील एकाच जागेसाठी निवडणूक लढविता येते आणि एका जागेसाठी जास्तीत जास्त चार नामनिर्देशनपत्रे दाखल करता येतात, असं  काकाणी यांनी सांगितलं.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
प्रचार संपण्याआधीच निवडणूक आयोगाचा नवा आदेश, सर्व राजकीय पक्षांना अलर्ट!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल