TRENDING:

Ahmednagar News : भंडारदरा धरणात मस्ती बेतली जीवावर; शिर्डी येथील तरुणाचा मित्रांच्या डोळ्यांदेखत गेला जीव

Last Updated:

Ahmednagar News : शिर्डी येथील एका तरुणाचा उत्साहाच्या भरात भंडारदरा धरणात जीव गेल्याची घटना घडली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अहमदनगर, (हरिष दिमोटे, प्रतिनिधी) : पावसाळा सुरू झाला की पर्यटक मोठ्या प्रमाणात वर्षा सहलीसाठी बाहेर पडतात. पावसाळ्यात भंडारदरा परिसर पर्यटकांनी गजबजून जातो. अनेकदा उत्साहाच्या भरात जीवावर बेतण्याचीही भिती असते. अशीच एक घटना समोर आली आहे. भंडारदरा धरणात मस्ती करताना तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
भंडारदरा धरणात मस्ती बेतली जीवावर
भंडारदरा धरणात मस्ती बेतली जीवावर
advertisement

नेमकं काय घडलं?

शिर्डीतून 6 मित्र 22 जूनच्या सकाळी अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरण परिसरात पर्यटनासाठी आले होते. सकाळी सात वाजता सहाजण भंडारदऱ्याच्या दिशेने रवाना झाले. साहिल खालील शेख, सोफियान जावेद शहा, शाहरुक समिर पठाण, फैजान शहा, मकसुद शब्बीर शेख तसेच सद्दाम शमिम शेख असे भंडारदरा धरण परिसरात फिरण्यासाठी आलेल्या तरुणांची नावे आहेत.

advertisement

वाचा - पुण्यात कोयता गँगची हिंमत वाढली? थेट पोलिसांच्या गाडीवर हल्ला! घटनास्थळाचे PHOTO

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
आले दर तेजीत, गुळ आणि शेवग्याला आज काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

हे सर्वजण सकाळी 10.00 वा भंडारदरा येथे पोहचले. त्यानंतर अर्धा तास भंडारदरा धरण परिसरात फिरले. 10.30 वा सुमारास सर्व मित्र आंघोळ करण्यासाठी भंडारदरा धरणात गेले. मकसुद शब्बीर शेख, साहिल खलील शेख आणी सद्दाम शमिम शेख एका ठिकाणी आंघोळ करत होते. तेव्हा सद्दाम याचा पाण्यात पाय घसरला. पोहता येत नसल्याने सद्दाम खोल पाण्यात बुडत गेला. मित्रांनी वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो फोल ठरला. आरडाओरडा केल्यानंतर आजूबाजूचे बाकीचे लोक पळत आले. मित्रांनी त्यांना सद्दाम पाण्यात बुडाल्याचं सांगितलं. कोणीतरी पोलीसांनाही फोन केला. त्यानंतर पोलीस सदर ठिकाणी दाखल झाले. त्यांनी स्थानिक लोकांचे मदतीने सद्दाम शमिम शेख याला पाण्याचे बाहेर काढले. त्यानंतर रुग्णवाहिकेने राजुर ग्रामिण रुग्णालय येथे आणले असता ते डॉक्टरांनी तपासुन त्याला मृत घोषित केले.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/अहमदनगर/
Ahmednagar News : भंडारदरा धरणात मस्ती बेतली जीवावर; शिर्डी येथील तरुणाचा मित्रांच्या डोळ्यांदेखत गेला जीव
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल