नगर तालुक्यात घरामधील पाण्याची मोटर बंद करण्यासाठी बाहेर पडलेल्या अल्पवयीन मुलीला आरोपीने बोळीत नेऊन अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलीने त्याला विरोध केला, मोटार का बंद झाली नाही हे पाहण्यासाठी वडील बाहेर आले असता वडिलांना मुलीचा आवाज आला, त्या दिशेने वडील गेले असतात आरोपीने तेथून पळून गेला. या प्रकरणाचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या वडिलांवरती आरोपीच्या कुटुंबाने हल्ला केला. त्यानंतर मुलीचे वडील घरी आल्यावर आरोपीच्या पूर्ण कुटुंबांने मुलीच्या घरात घुसून मुलीसह आई-वडीलांवरही हल्ला केला. या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर अहमदनगरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
advertisement
वाचा - नंबरप्लेट काढली, नंतर बॅरिकेड तोडले; वरळी सी-लिंकवर बाईकस्वाराची दादागिरी
पीडित मुलीचे वडील तिला रुग्णालयात घेऊन आले. रुग्णालयात उशिरा उपचार सुरू झाले. त्यानंतर फिर्याद देण्यासाठी गेलो असता पोलिसांनीही फिर्याद घेतली नाही. आमचे पोलीस कॉन्स्टेबल शासकीय रुग्णालयात येतील असे सांगून त्यांना दिसून काढून दिले. रुग्णालयात आले असता तेथील पोलिसांनीही तुमची फिर्याद घेऊ शकत नाही. तुम्ही पोलीस स्टेशनला जा असे सांगण्यात आले. त्यानंतर रात्री चार वाजता विनीत मुलीच्या वडिलांच्या यादीवरून हसन शेख, राजा हसन शेख, यांच्यासह सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणांमध्ये पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचं दिसत आहे.
