आधी नंबरप्लेट काढली, नंतर गाडीचा वेग वाढवून बॅरिकेड तोडले; वरळी सी-लिंकवर बाईकस्वाराची दादागीरी
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
वाहतूक पोलिसांनी वाहन अडवण्याचा प्रयत्न केला मात्र त्या अज्ञात स्कूटर चालक पळून गेला.
विजय वंजारा, प्रतिनिधी मुंबई : वांद्रे-वरळी सी लिंकवर कार वगळता कोणत्याही इतर वाहनांना परवानगी देण्यात आली नाही. तिथे सुरक्षाही कडक ठेवण्यात आली आहे. असं असतानाही पुन्हा एकदा सगळ्या सुरक्षेला चकवा देऊन पुन्हा एकदा दुचाकीने वांद्र वरळी सी लिंकवरुन जाण्याचं धाडक दोन तरुणांनी केलं आहे.
दुचाकी वाहनांना बंदी असताना एका स्कूटरचालकाने सिलिंकवरून वरळी ते वांद्रे हे संपूर्ण अंतर पार केलं. या आधी अशी घटना 26 फेब्रुवारीच्या आसपास घडल्याचा एक व्हिडीओ काही महिन्यांपूर्वी व्हायरल झाला होता. वाहतूक पोलिसांनी वाहन अडवण्याचा प्रयत्न केला मात्र त्या अज्ञात स्कूटर चालक पळून गेला.

advertisement
दरम्यान या प्रकरणी वांद्रे पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून आरोपी सध्या फरार आहे. आरोपी चालकांनी सिलिंकवर जाण्याआधी स्कूटीची नंबर प्लेट देखील काढली होतीय. त्यामुळे ही स्कूटी कोणाची आहे याचा पोलीस शोध घेऊ शकणार नाहीत असा त्यांचा समज असावा.
advertisement
पोलिसांनी चालकाला थांबवण्याचा प्रयत्न केला होता मात्र चालक वेगाने येऊन बैडिगेट उडवून सीलिंकवरुन पळून गेल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान आरोपींचा शोध पोलीस घेत आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली असून आरोपीचा शोध घेत आहेत. मात्र दुसऱ्यांदा असा प्रकार समोर आला आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 19, 2024 1:59 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
आधी नंबरप्लेट काढली, नंतर गाडीचा वेग वाढवून बॅरिकेड तोडले; वरळी सी-लिंकवर बाईकस्वाराची दादागीरी


