महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारासाठी श्रीगोंदा येथे महाविकास आघाडीची सभा घेण्यात आली. या सभेला शरद पवार, संजय राऊत, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात उपस्थित होते. यावेळेस बाळासाहेब थोरात यांनीही मोदींवर टीका केली. आता खेळामध्येही राजकारण होत असल्याचा आरोप होत आहे. थोरात यांनी आयपीएलमध्ये एका संघाचा रोहित शर्मा हे कॅप्टन होते, त्यांना बदलून हार्दिक पांड्या यांना कप्तान केले आहे. हार्दिक पांड्या फक्त गुजरातचा असल्यामुळेच त्याला कॅप्टन किल्ल्याच्या भावना इतर खेळाडूंमध्ये झाल्याने खेळाडूंमध्ये मोठी नाराजी आहे. यापूर्वी अशा प्रकारचे राजकारण कधीही झाले नव्हते असेही थोरात म्हणाले.
advertisement
संजय राऊत यांनीही भाजपावर टीका केली. देशातील आणि राज्यातील परिस्थिती पाहता येणाऱ्या काळात भारतात इंडिया आघाडीचे सरकार येणार आहे. नरेंद्र मोदी हे विरोधी पक्षात दिसतील. पंतप्रधान हे प्रधानमंत्री राहिले नसून ते आता प्रचारमंत्री झाले आहेत, असा टोला राऊत यांनी लगावला.
वाचा - 'निवडणूक होऊ द्या! एक एकाला कसा सरळ करतो पहाच तुम्ही' अजितदादांनी कोणाला भरला दम?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात सभा घेता याव्यात म्हणून महाराष्ट्रातील निवडणुकांचे वेळापत्रक बदललं गेलं. एवढ्या मोठ्या सभा का घ्याव्या लागतात? भारतातील संसदीय लोकशाही ही धोक्यात असून संविधान बदलण्याचा डाव पंतप्रधानांचा आहे. महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत नाही. तसेच विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुका ही येणाऱ्या काळात होणार नाही अशी भीतीही शरद पवार यांनी व्यक्त केली.
