Ajit Pawar : 'निवडणूक होऊ द्या! एक एकाला कसा सरळ करतो पहाच तुम्ही' अजितदादांनी कोणाला भरला दम?
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आंबेगाव येथे जाहीर सभेत बोलताना महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचं नाव न घेता दम भरला आहे.
पुणे, (रायचंद शिंदे, प्रतिनिधी) : बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीनंतर अजित पवार यांनी आपला मोर्चा शिरूरकडे वळवला आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे हे लोकसभा निवडणुकीच्या मैदानात आहेत. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव-पाटील हे आहेत. निवडणुका जाहीर झाल्यानंतर अजित पवारांनी अमोल कोल्हेंना निवडणुकीत पाडणार असे आव्हान दिले होते. त्यामुळे शिरूर लोकसभेची ही लढत आता प्रतिष्ठेची झाली आहे. आज अजित पवार यांची शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्यासाठी घोडेगाव, आंबेगाव येथे सभा पार पडली. या सभेतून अजितदादांनी अमोल कोल्हे यांचं नाव न घेता दम भरला आहे.
अजित पवार यांचा दम कोणाला?
रांजणगाव एमआयडीसी परिसरात वेडे वाकडे प्रकार मला ऐकायला मिळतात. त्यांना सरळ करण्याची गरज आहे. फक्त आचारसंहिता संपू द्या काही वेडं वाकडं करत असतील तर त्यांना खालून वरून बघून घेऊ असं म्हणत अमोल कोल्हेंचे नाव न घेता रांजणगाव एमआयडीसीत वेडे वाकडं प्रकार करणाऱ्यांना अजित पवारांनी दम भरला. आता याला खासदार अमोल कोल्हे कसं उत्तर देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
advertisement
दोन्ही खासदारांनी विकासासाठी निधी आणला नाही : अजित पवार
बारामतीत खासदार सुप्रिया सुळे आणि शिरुरमधुन खासदार अमोल कोल्हे यांना तुम्ही निवडून दिलं. मात्र, दोन्ही खासदारांनी विकासासाठी निधी आणला नसल्याची टीका अजित पवारांनी केली. संसदेत त्यांच्या विरोधात भाषण करताय अन् सांगता आम्हाला निधी मिळत नाही, अशी कारणं देता. पुणे नाशिक रेल्वे, वाहतूक कोंडीचे प्रश्न, मेट्रो रिंग रोड असे प्रश्न सोडवायचे आहे. यासाठी केंद्रात सत्तेत असलेला खासदार निवडून द्यायचं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. बारामती मतदारसंघात यंदा मतदान घटल्याचं पाहायला मिळालं. मात्र, बारामतीत मतदान वाढलं आहे. याचा फायदा नक्कीच आमच्या उमेदवाराला होईल, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.
Location :
Shirur,Pune,Maharashtra
First Published :
May 08, 2024 5:05 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Ajit Pawar : 'निवडणूक होऊ द्या! एक एकाला कसा सरळ करतो पहाच तुम्ही' अजितदादांनी कोणाला भरला दम?


