TRENDING:

मनोज जरांगे यांच्यावर कडाडून प्रहार, शायरीतून इशारा, धनंजय मुंडेंनी पंकजांचा मेळावा गाजवला

Last Updated:

Pankaja Munde : सालाबादाप्रमाणे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा भगवान भक्तिगडावर संपन्न होत आहे. या मेळाव्याला प्रथमच त्यांचे बंधू धनंजय मुंडे यांनी हजेरी लावली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अहमदनगर : महाराष्ट्रात मराठा समाजावर अन्याय होणार असेल, तर आपल्याला उठावा करावाच लागेल. यावेळी आपल्याला उलथापालथ करावीच लागेल, अशी गर्जना करून येत्या विधानसभेला समाजाने कोणती भूमिका घ्यावी हे स्पष्टपणे मराठा आरक्षणासाठी झटणारे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. त्यांच्या भूमिकेवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते, राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सडकून टीका केली. तुम लाख कोशिश करो हमे हराने की... हम जब जब बिखरेंगे-दुगुनी रफ्तार से निखरेंगे अशा शायरीतून धनंजय मुंडे यांनी जरांगे यांचे नाव न घेता प्रत्युत्तर दिले.
धनंजय मुंडे आणि मनोज जरांगे पाटील
धनंजय मुंडे आणि मनोज जरांगे पाटील
advertisement

सालाबादाप्रमाणे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा भगवान भक्तिगडावर संपन्न होत आहे. या मेळाव्याला प्रथमच त्यांचे बंधू धनंजय मुंडे यांनी हजेरी लावली आहे. मुंडे कुटुंबातील संघर्ष आणि त्यानंतर राज्यातील बदलत्या समीकरणांनुसार मुंडे बंधू भगिनींची जुळलेली मने या पार्श्वभूमीवर हा दसरा मेळावा पार पडतो आहे. त्यामुळे राज्यातील तमाम जनतेचे पंकजा यांच्या मेळाव्याकडे लक्ष लागलेले आहे.

advertisement

आपल्या हाती फक्त आपट्याची पानं, बाकीचे सोनं लुटून चाललेत : राज ठाकरे

पंकजा यांच्या मेळाव्यापासून काही किलोमीटर अंतरावर मनोज जरांगे पाटील यांचाही दसरा मेळावा पार पडतो आहे. त्यामुळे धनंजय मुंडे जरांगेंच्या मेळाव्यावर काय बोलणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. अपेक्षेप्रमाणे जरांगे यांच्या मेळाव्याच्या विषय धनंजय मुंडे यांनी छेडला पण त्यांनी नाव घेणे टाळले. ते म्हणाले, मला काही जणांनी मेळाव्यासंबंधी प्रश्न विचारले. मी म्हटले आनंद आहे. लोकशाहीत कुणीही मेळावा घेऊ शकतो. दसरा हा हिंदू धर्मातला सगळ्यात मोठा सण आहे. दसरा ज्याला माहिती आहे, त्याला प्रभू रामचंद्र माहिती असायला हवेत पुढचं मी काही बोलणार नाही, तुम्ही समजून घ्या... असे म्हणत त्यांनी जरांगे यांना टोला लगावला.

advertisement

मी भलेही गेली १२ वर्षे येथील दसरा मेळाव्याला आलो नसेन पण १२ वर्षात वेगळा दसरा मेळावा करायचा, असे माझ्या मनात सुद्धा आले नाही. कारण जो वारसा ज्याला दिलाय, त्याने तो पुढे न्यायचा असतो. एखादा नवीन दसरा मेळावा सुरू करून मेळाव्याची पवित्रता भंग करू शकत नाही, असे धनंजय मुंडे म्हणाले.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
आले दर तेजीत, गुळ आणि शेवग्याला आज काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

पुढे बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, 'हा मेळावा संपन्न होत असताना मला, व्यासपीठावर बसलेल्या सगळ्यांना आनंद होतोय. त्यापेक्षा जास्त आनंद समोर बसलेल्या जनतेला होतोय. सगळ्या जाती धर्माला सोबत घेऊन पंकजा ताईंच्या संघर्षाच्या सोबत राहू. १२ वर्षांचा प्रारब्ध मी भोगला, आता प्रारब्ध संपला. शेवटी एवढंच सांगतो, तुम लाख कोशिश करो- हमे हराने की... हम जब जब बिखरेंगे-दुगुनी रफ्तार से निखरेंगे...!'

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/अहमदनगर/
मनोज जरांगे यांच्यावर कडाडून प्रहार, शायरीतून इशारा, धनंजय मुंडेंनी पंकजांचा मेळावा गाजवला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल