Raj Thackeray : 'आपल्या हाती फक्त आपट्याची पानं, बाकीचे सोनं लुटून चाललेत', दसऱ्यानिमित्त राज ठाकरेंनी साधला संवाद
- Published by:Suraj
Last Updated:
मतदानाचं शस्त्र तुम्ही वर ठेवता, नंतर बाहेर काढून बोलता. पण मग मतदानाच्या दिवशी तुम्हाला काय होतं? असा सवाल राज ठाकरेंनी जनतेला विचारलाय.
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज राज्यातील जनतेशी संवाद साधला. एका पॉडकास्टच्या माध्यमातून त्यांनी हा संवाद साधला असून विधानसभेनिमित्त मतदारांना आवाहनही केलंय. मतदानाचं शस्त्र तुम्ही वर ठेवता, नंतर बाहेर काढून बोलता. पण मग मतदानाच्या दिवशी तुम्हाला काय होतं? असा सवाल राज ठाकरेंनी जनतेला विचारलाय. विधानसभा निवडणुकीत मतदानावेळी बेसावध राहू नका असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं.
राज ठाकरे म्हणाले की, आज संधी आलीय आणि माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे. तुम्ही सर्वांना संधी दिलीत, या निवडणुकीत मतदारांनी क्रांती केली पाहिजे. दरवर्षी दसऱ्याला आपण आपट्याची पाने वाटतो, आपल्या हातात आपट्याची पाने सोडून काहीच नाही राहत, बाकीचे सगळे सोने लुटून चाललेत.
दरवर्षी आपण दसऱ्याला सोने लुटतो, एकमेकांना शुभेच्छाही देतो. पण महाराष्ट्राचं सोनं अनेक वर्षांपासून लुटलं जात आहे. आपण फक्त एकमेकांना आपट्याची पानं वाटतो. आपल्या हातात आपट्याची पानं सोडून काहीच राहत नाही. बाकीचे सगळे सोनं लुटुन चाललेत. आपल्या हाती मोबाईल आला, टीव्ही आला म्हणजे प्रगती नाही. आजचा दसरा मेळावा महत्त्वाचा आहे कारण आगामी निवडणुका आहेत असंही राज ठाकरे म्हणाले.
advertisement
निवडणुकीच्या तोंडावर असलेला हा दसरा खूप महत्त्वाचा आहे. अशा वेळी तुम्ही सावध रहायला हवं. तुमच्यातला राग मला कधीच दिसत नाही. त्याच त्याच लोकांना निवडून देता. मतदानाच्या दिवशी तुम्ही मतांचं शस्त्र ठेवून देता आणि नंतर बाहेर काढता. तुम्ही सर्वांना संधी देता. तुम्ही ज्यांना सांभाळलं त्यांनी तुमच्यासोबत प्रतारणा केली. आता शमीच्या झाडावरचं शस्त्र बाहेर काढण्याची हीच वेळ असल्याचं राज ठाकरे म्हणाले.
advertisement
निवडणुकीत तुम्ही क्रांती करायला हवी. मी गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्राचं स्वप्न बघतोय. हे स्वप्न साकारण्याची संधी मला मिळू द्या. जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र मला बनवायचाय. मतदानादिवशी तुम्ही या सगळ्या लोकांचा वेध घ्या असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 12, 2024 12:07 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Raj Thackeray : 'आपल्या हाती फक्त आपट्याची पानं, बाकीचे सोनं लुटून चाललेत', दसऱ्यानिमित्त राज ठाकरेंनी साधला संवाद