नाशिक पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी गावाजवळ हा भीषण अपघात घडला. माल वाहतूक ट्रक कारवर कोसळला काल त्याखाली दबली गेली. या घटनेत अकोले तालुक्यातील चौघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. स्थानिक नागरिक व पोलीस घटनास्थळी दाखल झाले. हा अपघात इतका भीषण होता की क्रेनने कार तोडून मृतदेह बाहेर काढण्यात आले. अपघातामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांह रांगा उभ्या राहिल्या आहेत. अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरुन फरार झाला.
advertisement
वाचा - वडील, मूकी आई अन् लहान भाऊ.. कुटुंबाचा एकमेव आधारही स्फोटाने हिरावला, 22 वर्षीय आरतीचा..
15 दिवसांपूर्वी याच मार्गावर तिघांचा मृत्यू
सटाणा तालुक्यातील सायखेडा येथून पुण्याकडे निघालेल्या जीपने पाहाटे पाचच्या सुमारास ट्रकला मागून धडक दिली. दाट धुक्यामुळे जीपचालकाला अंदाज आला नाही. जीप चालक पंकज खंडु जगताप (वय 36), मधुकर तुकाराम अहिरे (वय 52), शांताराम संभाजी अहिरे (वय ५० सर्व रा. सायखेडा, ता. सटाणा, जि. नाशिकः) यांचा मृत्यू झाला. तर तीनजण जखमी झाले होते.
