Nagpur Factory Blast : वडील, मूकी आई अन् लहान भाऊ.. कुटुंबाचा एकमेव आधारही स्फोटाने हिरावला, 22 वर्षीय आरतीचा..

Last Updated:

Nagpur Factory Blast : नागपूर जिल्ह्यातील स्फोटक बनवणाऱ्या कारखान्यात रविवारी झालेल्या स्फोटात नऊ जण ठार तर तीन जण गंभीर जखमी झाले.

कुटुंबाचा एकमेव आधारही स्फोटाने हिरावला
कुटुंबाचा एकमेव आधारही स्फोटाने हिरावला
नागपूर, 17 डिसेंबर : स्फोटकांची निर्मिती करणाऱ्या कारखान्यात झालेल्या स्फोटाने नागपूर आज हादरलं. या घटनेत तब्बल 9 लोकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. बाजार गाव इथं असलेल्या सोलर एक्स्प्लोजिव कंपनीत हा अपघात घडला. मृतांचा आकडा 9 असून यात वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नीळकंठराव सहारे नावाच्या व्यक्तीच्या मुलीचा या स्फोटात मृत्यू झाला. ते म्हणाले, या घटनेमुळे माझं आयुष्य उद्ध्वस्त झालंय. अद्याप तिचा मृतदेहही पाहायला मिळाला नाही.
नागपूरपासून सुमारे 35 किमी अंतरावर असलेल्या बाजारगाव परिसरातील 'सोलर इंडस्ट्रीज' या कंपनीत रविवारी सकाळी झालेल्या स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या नऊ जणांमध्ये सहारे यांची मुलगी आरतीचा (22) समावेश आहे. आरती ही कुटुंबातील एकमेव कमावती व्यक्ती होती. आरती आपल्या कुटुंबातील वडील, मूकी आई आणि लहान भावाचा एकमेव आधार होती. आपल्या मृत मुलीला पाहण्यासाठी सकाळी साडेनऊ वाजल्यापासून कारखान्याच्या गेटबाहेर थांबल्याचे सहारे यांनी सांगितले. वडील म्हणाले, "मला काहीही नको, फक्त माझ्या मुलीचा मृतदेह सोपवा." सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटात ठार झालेल्या कामगारांचे मृतदेह अजूनही संकुलातच आहेत.
advertisement
सोलर इंडस्ट्रीजच्या प्रवेशद्वारावर अनेक रुग्णवाहिका तैनात आहेत. स्थानिकांनी आणि पीडितांच्या कुटुंबीयांनी युनिटच्या प्रवेशद्वाराजवळ गर्दी केली आहे. कारखान्याच्या आवारात प्रवेश देण्याची मागणी केली, त्यामुळे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती.
दोन मुलांची आई रुमिता उईके (वय 32) हिलाही या अपघातात जीव गमवावा लागला. कारखान्याबाहेर उभे असलेले उईकेचे वडील देविदास इरपाटी यांनी सांगितले की, अपघाताची माहिती इतरांमार्फत मिळाली. स्फोटक निर्मिती युनिटजवळ खैरी येथे राहणारी रुमिता रविवारी धामणगाव येथील आपल्या घरी जाणार होती. देविदास यांनी सांगितले की, रुमिताला दोन मुले असून तिचा नवरा शेतमजूर म्हणून काम करतो. ते म्हणाले, “आम्हाला माहित नाही की ते रुमिताचा मृतदेह आमच्याकडे कधी सोपवतील. आम्ही इथे त्याची वाट पाहत आहोत.”
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नागपूर/
Nagpur Factory Blast : वडील, मूकी आई अन् लहान भाऊ.. कुटुंबाचा एकमेव आधारही स्फोटाने हिरावला, 22 वर्षीय आरतीचा..
Next Article
advertisement
Dhule Election: भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आरोपाने खळबळ
भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आर
  • मतदान केंद्रावर मोठा गोंधळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • प्राथमिक विद्यामंदिरातील मतदान केंद्रात असलेल्या मतदान यंत्राची तोडफोड

  • भाजप कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे.

View All
advertisement