अर्जुन पवार आणि राजेश राठोड हे दोघे गुरुवारी शेवगावला आले. त्याने पाथर्डीजवळील एका शेडमध्ये त्यांना सोडले. तेथे चौघे मुक्कामी राहिले. शुक्रवारी संदीप मच्छिंद्र पवार याने मोबाइल मधील फोटो दाखवत हा पिण्या कापसे असून, त्याला संपवायचे आहे, असे सांगितले होते. शनिवारी (दि. 2) मार्च सकाळी संदीप पवार हा मुक्कामाच्या ठिकाणी आला. दोन पिस्टल आणि तीन कोयते दाखवून स्वतःजवळ ठेवले. त्यांनतर सर्व चौघे दोन वेगवेगळ्या मोटारसायकलवरून शेवगाव येथे गेले. कापसे न सापडल्याने पुन्हा पाथर्डीला परतले. रविवारी संदीप आणि अन्वर हे पाथर्डीला आले. यातील संदीप याने एक पिस्टल गणेश तर दूसरे डीके याच्याकडे दिले. त्यानंतर पिन्या कापसे शेवगाव येथील हॉटेल शुभम शेजारील रसवंतीगृह येथे बसलेला असल्याचे सांगितले. ते सर्वजण दोन दुचाकींवरून तेथे पोहोचले. दुपारी दीडच्या सुमारास डीके याने पिस्टलमधून फायरचा प्रयत्न केला. तसेच गणेश यानेही त्याच्याकडील पिस्टल काढून दोन राऊंड फायर केले. परंतु, ते पिन्या कापसे याला लागलेच नाहीत. त्यांनतर सर्वजण तेथून जात असताना पिन्याने एका दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली.
advertisement
वाचा - गुंडांना बोलावून सेक्रेटरीला बेदम मारहाण, पुण्यातील उच्चभ्रू सोसायटीतील प्रकार
नेम चुकला अन् कापसे वाचला..
अर्जुन पवार, राजेश गणेश राठोड हे पिन्या कापसे याला मारण्यासाठी शेवगावला आले होते. त्या दोघा युवकांच्या बंदुकीचा नेम चुकल्याने तो वाचला. त्यानंतर कापसे याने मारण्यासाठी आलेल्या युवकांनाच बेदम मारहाण केली. दरम्यान, या हाणामारीत कापसेदेखील जखमी असल्याने त्याच्यावर नगर येथे वैद्यकीय उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
