Pune News : गुंडांना बोलावून सेक्रेटरीला बेदम मारहाण, पुण्यातील उच्चभ्रू सोसायटीतील प्रकार, LIVE VIDEO

Last Updated:

Pune News : पिंपरी चिंचवड मधील एका उचभ्रू सोसायटीत किरकोळ कारणातून बाहेरच्या गुंडांना बोलावून सोसायटी सदस्याला बेदम मारहाण केली.

गुंडांना बोलावून काठ्या रॉडने बेदम मारहाण
गुंडांना बोलावून काठ्या रॉडने बेदम मारहाण
पिंपरी चिंचवड, (गोविंद वाकडे, प्रतिनिधी) : पिंपरी चिंचवड शहरातील महिंद्रा अँथिया या उच्चभ्रू सोसायटीमध्ये किरकोळ वादातून एका सोसायटी मेंबरवर दुसऱ्या मेंबरने बाहेरील गावगुंड बोलावून मारहाण केली. या संदर्भात पिंपरी पोलिसांत परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सोसायटीचा मेंबर असलेले केतन यशवंत थोरात यांनी सोसायटीचे सेक्रेटरी सागर शिवाजी किल्लेदार यांना शिवीगाळ करत बाहेरील गुंड बोलावून मारहाण केली. या घटनेची दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात देखील कैद झाली आहे.
नेमकं काय घडलं?
2 मार्चला दुपारच्या सुमारास नेहरूनगर रोड, पिंपरी येथील नावाजलेल्या अँथिया सह. गृहरचना संस्थेच्या आवारात एक अत्यंत निंदनीय घटना घडली. सोसायटीचे मानद सचिव सागर शिवाजी किल्लेकर यांच्यावर केतन थोरात नामक सभासदाने बाहेरून आलेल्या चार अज्ञात व्यक्तींच्या साथीने जीवघेणा हल्ला केला. हल्लेखोरांनी लाथा बुक्क्यांबरोबर लाठ्याकाठ्या आणि धातूच्या रॉडने हल्ला केला. यामध्ये सागर किल्लेकर यांच्या डोक्याला, चेहऱ्याला, पोटाला आणि हातापायांना गंभीर दुखापत झालेली आहे.
advertisement
काय होतं वादाचं कारण?
केतन थोरात यांनी नियमबाह्य पद्धतीने चारचाकी वाहन पार्क केलं होतं, त्यावरुनच हा वाद झाला. याच वादावादीचे रुपांतर नंतर हाणामारीत झालं. अँथिया सह. गृहरचना संस्थेच्या प्रस्थापित नियमावली अन्वये सागर किल्लेकर हे केतन थोरात यांना नोटीस देऊन आपले कर्तव्य बजावत होते. अँथिया सह. गृहरचना संस्थेचे विद्यमान सदस्य केवळ त्यांच्या सामाजिक बांधिलकीतून कोणतेही आर्थिक मानधन न घेता आपली कर्तव्ये पार पाडण्यासाठी आपला वैयक्तिक वेळ, शक्ती आणि काही वेळा पैसा खर्च करतात.
advertisement
एकंदर गृहरचना व्यवस्थापन समितीच्या सदस्यांविरुद्ध केलेल्या अशा प्रकारच्या गुन्हेगारी आणि द्वेषपूर्ण कृती अत्यंत निराशाजनक आणि निराशाजनक आहेत आणि समाजाने अशा गुन्हेगारी मानसिकतेच्या सदस्यांविरुद्ध एकजूट होऊन त्यांना कठोरपणे वठणीवर आणण्याची गरज आहे. अशा समाज विघातक शक्तींना वेळीच आवर घातला पाहिजे; नाही तर तो दिवस दूर नाही जेव्हा कायद्याचे पालन करणाऱ्या आणि शांतताप्रिय रहिवाशांसाठी पिंपरी चिंचवड मधील सोसायटींमध्ये फिरणेही असुरक्षित होईल; याचा गांभीर्याने विचार करणे ही काळाची गरज बनलेली आहे, असं आवाहन समितीने केलं आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune News : गुंडांना बोलावून सेक्रेटरीला बेदम मारहाण, पुण्यातील उच्चभ्रू सोसायटीतील प्रकार, LIVE VIDEO
Next Article
advertisement
Dhule Election: भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आरोपाने खळबळ
भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आर
  • मतदान केंद्रावर मोठा गोंधळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • प्राथमिक विद्यामंदिरातील मतदान केंद्रात असलेल्या मतदान यंत्राची तोडफोड

  • भाजप कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे.

View All
advertisement