Police Transfers : गृहविभागाला मोठा धक्का! लोकसभेसाठी केलेल्या 'त्या' पोलिसांच्या बदल्या रद्द
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Police Transfers : 45 पोलीस निरीक्षकांनी निवडणूक आयोगाच्या अटी लागू होत नसल्याच कारण देत कोर्टात धाव घेतली होती.
पुणे, (वैभव सोनवणे, प्रतिनिधी) : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांनुसार या बदल्यांचे आदेश अतिरिक्त पोलीस महासंचालक संजीव कुमार सिंघल यांनी काढले होते. यामध्ये पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील 40 तर पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील 13 पोलीस निरीक्षकांचा समावेश होता. असे असताना 45 पोलीस निरीक्षकांनी निवडणूक आयोगाच्या अटी लागू होत नसल्याच कारण देत बदली रद्द करण्यासाठी मॅट कोर्टात धाव घेतली होती. यावर कोर्टाने गृहविभाला मोठा धक्का दिला आहे.
काय आहे प्रकरण?
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य पोलीस दलातील प्रत्येक जिल्ह्यात, आयुक्तालयात एकाच शहरात पाच पेक्षा जास्त वर्षांचा कालावधी किंवा एकाच विभागात तीन वर्षांचा कालावधी पूर्ण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याच्या सूचना असतात. त्यानुसार भारतीय निवडणूक आयोगाने पोलीस महासंचालक कार्यालयाला तशा सूचना दिल्या होत्या. यामध्ये 129 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. परंतू, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यभरातल्या पोलिस निरीक्षकांच्या बदल्या केल्या होत्या. मात्र, त्यातील तब्बल 45 पोलीस निरीक्षकांनी निवडणूक आयोगाच्या अटी लागू होत नसल्याचं कारण देत बदली रद्द करण्यासाठी मॅट कोर्टात धाव घेतली होती. निवडणूक आयोगाच्या सूचना तपासून या अधिकाऱ्यांच्या बदल्या रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने गृह विभागाला मोठा दणका दिला आहे.
advertisement
सात टप्प्पात निवडणूक
view commentsआगामी लोकसभा निवडणुकांच्या तारखा 13 मार्चनंतर कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे. 2024 ची लोकसभा निवडणूक 2019 प्रमाणे असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 2019 मध्ये लोकसभेच्या 543 जागांसाठी एकूण सात टप्प्यांत मतदान झाले होते. लोकसभा निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. निवडणूक आयोगाकडून नियोजन केले जात आहे. राजकीय पक्षही निवडणूक तारखांच्या घोषणांची वाट पाहत आहेत. भारतीय निवडणूक आयोगाचे अधिकारी निवडणूक तयारीची पाहणी करण्यासाठी विविध राज्यांचे दौरे करत आहेत. हे दौरे 12 मार्चपर्यंत पूर्ण होणार आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 04, 2024 8:49 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Police Transfers : गृहविभागाला मोठा धक्का! लोकसभेसाठी केलेल्या 'त्या' पोलिसांच्या बदल्या रद्द










