काय म्हणाले विखे पाटील?
यावर बोलताना राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले आप्पासाहेब पवार आणि विखे कुटुंबाचे जवळचे संबंध होते. आप्पासाहेब हे स्वाभिमानी जगणारे होते. त्यामुळे त्यांचा राजकारणावर कुठलाही परिणाम झाला नाही. त्यावेळेस शरदचंद्र पवार साहेब सक्रीय राजकारणात होते. त्यामुळे कदाचित त्यांचा रोहित पवार यांना इशारा असेल जास्त धावपळ करू नको. नाहीतर अजित पवार यांच्यासारखी तुझीही फसगत होईल, असं त्यांना सुचवायचं असेल, असा टोला विखे पाटील यांनी लगावला आहे.
advertisement
काय आहे प्रकरण?
शरद पवारांनी तेव्हा मला राजकारणात येऊ दिलं असतं तर कदाचीत पवार कुटुंबं तेव्हाच फुटलं असतं, असा मोठा गौप्यस्फोट शरद पवार गटाचे आमदार यांचे वडील राजेंद्र पवार यांनी केला आहे. राज्याच्या नव्हे देशाच्या राजकारणातही पवार कुटुंबाच्या ऐक्याचे दाखले दिले जायचे. पण अखेर हे कुटुंबं देखील अजित पवारांच्या बंडखोरीने फुटलंच. पण या कौटुंबिक राजकीय फुटीचं खरं कारण आजवर कधीच समोर येत नव्हते. पण काल परवा आम्ही बारामतीकर या नावाने एक निनावी पत्र व्हायरलं झालं आणि सगळाचं भांडाफोड झाला. पण तरीही कॅमेऱ्यासमोर कोणीच काही बोलत नव्हतं. पण आता थेट राजेंद्र पवार यांनीच यावर भाष्य केलं आहे. खरंतर, 'त्यावेळी मलाही राजकारणात यायचं होतं. पण साहेबांनी त्यावेळी मला थांबायला सांगितले,' असा मोठा गौप्यस्फोट राजेंद्र पवार यांनी केला आहे.
वाचा - मोठी बातमी, चक्क मुख्यमंत्र्यांची खोटी सही आणि शिक्के वापरले, मंत्रालयात खळबळ
पहिल्यांदाच पवार कुटुंबातील वाद चव्हाट्यावर
देशात राजकारण करायचं असल्याने पवारांनी कौटुंबिक वाद आजवर कधीच चव्हाट्यावर येऊ दिले नव्हते. पण सख्खा पुतण्यानेच पवारांच्या पक्षावर ताबा मारल्याने आता अजित पवारांमुळे संधी गमवावी लागलेले राजेंद्र पवार पहिल्यादांच जाहिरपणे मनातलं बोलून गेलेत. त्यामुळे अजित पवार या आरोपांना नेमकं प्रत्युत्तर देतात हे पाहणं मोठं औत्सुक्याचं ठरणार आहे.
