मोठी बातमी, चक्क मुख्यमंत्र्यांची खोटी सही आणि शिक्के वापरले, मंत्रालयात खळबळ

Last Updated:

मुख्यमंत्र्यांची बनावट सही आणि शिक्का मारल्याचं लक्षात आल्यानंतर मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

News18
News18
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खोटी सही आणि शिक्के वापरल्याचा धक्कादायक प्रकार मुख्यमंत्री सचिवालयात उघडकीस आला आहे. मुख्यमंत्र्यांची खोटी सही आणि शिक्के वापरल्याच्या या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्र्यांची बनावट सही आणि शिक्का असलेली काही निवेदने समोर आली असून या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. सचिवालयात कार्यवाहीसाठी आलेल्या काही निवेदनांवर मुख्यमंत्री शिंदे यांची बनावट स्वाक्षर आणि शिक्के असल्याचं आढळून आलं. मुख्यमंत्री सचिवालयाच्या निदर्शनास ही बाब येताच याप्रकरणी मरीन लाइन्स पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, मुख्यमंत्री सचिवालयास प्राप्त झालेल्या दहा ते बारा निवेदनांवर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी आणि शिक्के संशयास्पद व बनावट असल्याचे कर्मचाऱ्यांना निदर्शनास आले. त्यांनी ही बाब वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिली. मुख्यमंत्र्यांनी याची गंभीर दाखल घेतली असून तातडीने पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याचे निर्देश दिले.
मुख्यमंत्र्यांची सही आणि शेरे असलेली निवेदने व पत्र पुढील कार्यवाहीसाठी ठिकठिकाणाहून मुख्यमंत्री सचिवालयात येतात. या निवेदनांची नोंद टपाल शाखेत होते. त्यानंतर ती ई ऑफिस प्रणालीत नोंद करण्यात येतात. तिथून ती कागदपत्रे, निवेदने संबंधित प्रशासकीय विभागांना पाठवण्यात येतात. बनावट सही आणि शिक्का मारल्याचं लक्षात आल्यानंतर मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. कार्यालयीन कर्मचाऱ्यांनीही अधिक सतर्कपणे काम करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
मोठी बातमी, चक्क मुख्यमंत्र्यांची खोटी सही आणि शिक्के वापरले, मंत्रालयात खळबळ
Next Article
advertisement
Dhule Election: भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आरोपाने खळबळ
भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आर
  • मतदान केंद्रावर मोठा गोंधळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • प्राथमिक विद्यामंदिरातील मतदान केंद्रात असलेल्या मतदान यंत्राची तोडफोड

  • भाजप कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे.

View All
advertisement