लोकसभा मतदारसंघात उमेदवारी कोणाला द्यायची? याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाची मुंबईत या आठवड्यात बैठक झाली. या बैठकीत काही नावांवर चर्चा झाली. पण, ठोस नाव समोर आले नाही. मात्र 2024 च्या लोकसभेसाठी रोहित पवार यांचे नाव आघाडीवर होते. त्यानंतर माजी मंत्री प्राजक्त तनपुरे आणि राजेंद्र फाळके यांचं नाव पुढे आले. मात्र यावर कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी लोकसभा लढवण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
advertisement
निलेश लंके यांना राष्ट्रवादीने प्रवेशाची ऑफर दिली आहे. दसऱ्यापर्यंत ते माघारी परतले तर त्यांचा उमेदवारीसाठी विचार होईल, असा प्रस्ताव त्यांच्यासमोर पक्षाने ठेवला आहे. यातून असे ध्वनित होते की शरद पवार हे निलेश लंके यांच्यावर नजर ठेवून आहेत. अजित पवार सत्तेत सहभागी झाले त्यावेळी लंके काय भूमिका घेणार, ते शरद पवार यांना साथ देणार की अजित पवारांसोबत जाणार? याबाबत उत्सुकता होती. पण, लंके यांनी सत्तेसोबत जाण्याचा निर्णय घेतला. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि लंके यांच्यात तीव्र संघर्ष आहे. याचा परिणाम पारनेर तालुक्याच्या निधीवर झाला होता.
विकासकामांसाठी निधीच उपलब्ध होत नसल्याने लंके यांना अजित पवार यांच्यासोबत जाण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यांची ती अपरिहार्यता होती, असे त्यांचे कार्यकर्ते सांगतात. लंके यांची देहबोलीही तेच सांगते. कारण, विखेंसोबतच्या शासकीय बैठकांना ते फारसे उपस्थित नसतात. विखे आणि लंके यांचे मनोमिलन झालेले नाही. त्यामुळेच लंके हे मनाने शरद पावर यांच्या गटाकडे आहेत, अशी भूमिका राष्ट्रवादीच्या बैठकीत या पक्षाचे पारनेर तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे यांनी मांडली. त्यावर पवार समर्थकांकडून प्रतिक्रिया होती की 'लंके पवारांसोबत आहेत तर ते त्यांनी जाहीरपणे सांगायला हवे. म्हणून बहुधा प्राजक्त तनपुरे यांनी पत्रकार परिषद घेत तसा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.
वाचा - आता फक्त दोन दिवस; आरक्षण मिळालं नाही तर..., जरांगे पाटलांनी सांगितला पुढचा पर्याय
राष्ट्रवादी पक्षाचे पारनेर तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे यांनी निलेश लंके यांनी विचार करावा अशी भूमिका मांडली. मात्र, यावर बोलताना विखे म्हणाले जो माणूस ग्रामपंचायतीला पडला त्यांनी मांडलेल्या भूमिकेला किती महत्त्व द्यावं हा तुमचा विषय आहे, असे बोलून त्यांनी या विषयावर दुर्लक्ष केलं. सर्वजण आपल्या नवीन मित्राच्या शोधत असल्याची टिपणी यांनी केली. यामुळे राम शिंदे आणि निलेश लंके यांनी अनेकदा बोलताना पक्षाने जबाबदारी दिल्यास आपण निवडणूक लढू असं राम शिंदे आणि निलेश लंके म्हणाले आहेत.
मात्र, शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून माजी मंत्री शंकराव गडाख यांनीही मोर्चे बांधणी सुरू केली आहे तर भाजपातील आमदार राम शिंदे यांनीही आपण लोकसभा लढवण्यास इच्छुक असल्याचं अनेकदा बोलून दाखवले आहे. त्यामुळे सुजय विखे यांच्या विरोधात 2024 च्या निवडणुकीमध्ये भाजपाचे राम शिंदे, निलेश लंके की यशवंतराव गडाख यापैकी कोण याची चर्चा सध्या नगरच्या राजकारणा सुरू आहे.
