Maratha Reservation : आता फक्त दोन दिवस; आरक्षण मिळालं नाही तर..., जरांगे पाटलांनी सांगितला पुढचा पर्याय

Last Updated:

अखेर मनोज जरांगे पाटील यांनी आज मराठा आरक्षणाबाबतची आपली पुढची दिशा स्पष्ट केली आहे. यावेळी बोलताना त्यांनी सरकारला इशारा दिला आहे.

News18
News18
जालना, 22 ऑक्टोबर, सिद्धार्थ गोदाम: राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच तापला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळून देण्यासाठी सरकारला चाळीस दिवसांचा वेळ दिला होता. येत्या 24 ऑक्टोबरला ही मुदत पूर्ण होत आहे. आपण आरक्षणाबाबतची आपली पुढील भूमिका 22 ऑक्टोबरला स्पष्ट करणार असल्याचं जरांगे पाटील यांनी म्हटलं होतं. त्यानुसार आज जरांगे पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
सरकारने येत्या 24 ऑक्टोबरपर्यंत आरक्षणाचा निर्णय घेतला नाही तर  25 तारखेपासून मराठा समाजाला न्याय मिळावा यासाठी पुन्हा अमरण उपोषणाला सुरुवात करणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. 25 तारखेपासून जे उपोषण सुरू होईल, तेव्हा कोणतेही वैद्यकीय उपचार घेतले जाणार नाहीत, तसेच पाणी सुद्धा पिणार नसल्याचं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की मराठी समाजाला न्याय मिळेपर्यंत हे उपोषण सुरूच राहिल. गावात एकाही राजकीय नेत्याला एन्ट्री मिळणार नाही.
advertisement
पुढे बोतलाना जरांगे पाटील म्हणाले की, प्रत्येक सर्कलमध्ये साखळी उपोषणं सर्व गावांच्यावतीने २५ तारखेपासून एकाच ठिकाणी ताकदीने सुरू केली जातील. २८ पासून त्याच साखळी उपोषणाचं रुपांतर आमरण उपोषणात होणार आहे. याची सर्कलनिहाय तयारी मराठा समाजाने केली आहे. सर्व गावांनी सर्कलच्या ठिकाणी एकत्र येऊन कायमस्वरुपी बसून रहायचं. प्रत्येक तालुक्यात आणि प्रत्येक गावात प्रचंड संख्येनं समाजाने एकत्र येऊन कँडल मार्च काढायचे. हे शांततेचं आंदोलन सुरु झाल्यानंतर सरकारला झेपणार नाही. पुढील २५ तारखेला पुन्हा एकदा  आंदोलनाची दिशा सांगणार असल्याचं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
Maratha Reservation : आता फक्त दोन दिवस; आरक्षण मिळालं नाही तर..., जरांगे पाटलांनी सांगितला पुढचा पर्याय
Next Article
advertisement
ZP Election: आता शाई पुसून दाखवाच! जिल्हा परिषदसाठी निवडणूक आयोगाचा नवा प्लॅन तयार, घेतला मोठा निर्णय
आता शाई पुसून दाखवाच! जिल्हा परिषदसाठी निवडणूक आयोगाचा नवा प्लॅन तयार, घेतला मोठ
  • मतदारांच्या बोटावर लावलेली मार्करची शाई सहज पुसली जात असल्याचे आरोप

  • निवडणूक आयोगाने यावर स्पष्टीकरण देत मतदारांचा गोंधळ दूर करण्याचा प्रयत्न केला

  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार

View All
advertisement