काकीनाडा एक्स्प्रेस नव्या रुपात
शिर्डी – काकीनाडा एक्स्प्रेसला एक प्रथम वातानुकूलित डबा, दोन द्वितीय वातानुकूलित, चार तृतीय वातानुकूलित, दोन तृतीय इकॉनॉमी, पाच शयनयान, चार सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे, एक द्वितीय आसन व्यवस्था व सामान गार्ड ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर कार अशी सुधारित रचना असेल.
advertisement
नव्या रुपात कधीपासून धावणार?
साईनगर शिर्डी काकीनाडा पोर्ट एक्स्प्रेस (क्र. 17205) ही गाडी 14 ऑक्टोबर 2025 पासून सुधारित संरचनेसह शिर्डीहून रवाना होईल. तर ट्रेन क्रमांक 17206 ही काकीनाडा पोर्ट ते साईनगर शिर्डी एक्सप्रेस 13 ऑक्टोबर 2025 पासून काकीनाडा पोर्टहून धावणार आहे.
दरम्यान, साईनगर शिर्डी ते काकीनाडा पोर्ट एक्सप्रेसच्या नव्या रुपामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून प्रवास अधिक आरामादायी आणि सुखकर होईल.
advertisement
Location :
Shirdi,Ahmadnagar,Maharashtra
First Published :
Aug 06, 2025 11:47 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अहमदनगर/
Sainagar Shirdi: शिर्डी ते काकीनाडा एक्स्प्रेस बाबत मोठी अपडेट, तिकीट बुक करण्याआधी हे वाचा
