Mumbai Goa Highway: मुंबई गोवा महामार्गावर या वाहनांना बंदी, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सरकारचा मोठा निर्णय

Last Updated:

Mumbai Goa Highway: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह उपनगरांतून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मोठी असते. मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी असणार आहे.

Mumbai Goa Highway: मुंबई गोवा महामार्गावर या वाहनांना बंदी, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सरकारचा मोठा निर्णय
Mumbai Goa Highway: मुंबई गोवा महामार्गावर या वाहनांना बंदी, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सरकारचा मोठा निर्णय
मुंबई : गणेशोत्सवात मुंबईसह ठाणे आणि उपनगरांतून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मोठी असते. त्यामुळे मुंबई – गोवा महामार्गावर गर्दी वाढण्याची शक्यता असते. याच पार्श्वभूमीवर गणपतीत मुंबई – गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. या काळात केवळ रुग्णवाहिका, रेशनिंग साहित्य व अन्य अत्यावश्यक सेवेतील गाड्यांना परवानगी असेल.
यंदा देखील गणेश चतुर्थीला सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मोठी असते. यासाठी प्रशासनाकडून महत्त्वाची पाऊले उचलली जात आहेत. नियमित जाणाऱ्या एसटी बससह जवळपास 3 हजार जादा बस चालवण्यात येणार आहेत. त्यामुळे 23 ते 26 ऑगस्ट दरम्यान मुंबई – गोवा महामार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीची शक्यता आहे.
advertisement
गणेशोत्सव काळात वाहतूक कोंडीची शक्यता असल्याने यंदा देखील अवजड वाहनांना मुंबई – गोवा महामार्गावर वाहतूक बंदी असणार आहे. याबाबत लवकरच एक प्रसिद्धी पत्रक काढण्यात येणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. ही बंदी गणेश चतुर्थीच्या काळात राहणार असली तरी अत्यावश्यक सेवेतील गाड्यांना मात्र वाहतुकीची मुभा देण्यात येणार आहे.
advertisement
अवजड वाहनांना पुण्याहून जाण्यास परवानगी
मुंबई गोवा मार्गावर अवजड वाहनांना गणेश चतुर्थीच्या काळात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. मात्र, या काळात अवजड वाहनांना व्हाया पुणे सातारा, कराड, कोल्हापूरमार्गे गोव्याला जाण्यासाठी पर्यायी व्यवस्था राहणार आहे. पश्चिम महाराष्ट्र व कोकणाला जोडणाऱ्या घाटातून अवजड वाहने कोकणात जाऊ शकतील.
दरम्यान, मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांची टीम ठीक ठिकाणी कार्यरत असेल. तसेच बंद पडणाऱ्या गाड्यांमुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी देखील ‘टोविंग व्हॅन’ तैनात करण्यात येणार आहेत.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Goa Highway: मुंबई गोवा महामार्गावर या वाहनांना बंदी, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सरकारचा मोठा निर्णय
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement