ठाण्यातील वाहतुकीत मोठे बदल, घोडबंदर रोड 4 दिवस बंद राहणार, पर्यायी मार्ग कोणते?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Bhavna Arvind Kamble
Last Updated:
Thane Traffic: ठाण्यातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत. 8 ऑगस्टपासून पुढील 4 दिवस काही मार्ग बंद राहणार असून वाहतूक वेगळ्या मार्गांनी वळवण्यात आलीये.
ठाणे: ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. घोडबंदर रोडवरील गायमुख घाट परिसरात रस्त्याचे डांबरीकरण आणि भौमितिक सुधारणा काम करण्यात येत आहे. त्यासाठी ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या कासारवडवली वाहतूक उपविभागाने वाहतूक नियोजनात महत्त्वाचे बदल केले आहेत. हे काम 8 ऑगस्ट रोजी रात्री 12:01 वाजता सुरू होऊन 11 ऑगस्ट रोजी सकाळी 5:00 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. या कालावधीत जड व अवजड वाहनांसाठी काही मार्ग बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे गैरसोय टाळण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करावा लागेल.
ठाणे–घोडबंदर वाहतूक बदल:
प्रवेशबंदी
- ठाणे व मुंबईहून घोडबंदरकडे जाणाऱ्या जड वाहनांना वाय जंक्शन व कापुरबावडी जंक्शन येथे प्रवेशबंदी.
- मुंब्रा/कळवा मार्गे येणाऱ्या वाहनांना खारेगाव टोल नाक्यावर प्रवेशबंदी.
- नाशिकहून येणाऱ्या वाहनांना मानकोली नाक्यावर प्रवेशबंदी.
पर्यायी मार्ग:
- वाय जंक्शन/कापुरबावडीहून नाशिक रोड, खारेगाव टोल, मानकोली, अंजूरफाटा मार्गे वाहने वळवण्यात येतील.
- मुंब्रा/कळवा मार्गे येणारी वाहने खारेगाव खाडी ब्रिजखालून, मानकोलीमार्गे वळवण्यात येतील.
- नाशिकहून येणारी वाहने मानकोली ब्रिजखालून अंजूरफाटा मार्गे वळवण्यात येतील.
advertisement
घोडबंदर–ठाणे वाहतूक बदल
प्रवेशबंदी:
- गुजरातहून येणाऱ्या वाहनांना चिंचोटी नाक्यावर प्रवेशबंदी.
- मुंबई, विरार व वसईहून येणाऱ्या वाहनांना फाउंटन हॉटेलजवळ प्रवेशबंदी.
पर्यायी मार्ग:
- चिंचोटी नाका, कामण, अंजूरफाटा, मानकोली–भिवंडीमार्गे वाहने वळवण्यात येतील.
ही वाहतूक अधिसूचना 8 ते 11 ऑगस्ट दरम्यान लागू राहणार असून फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका, पोलीस व अन्य अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे.
view commentsLocation :
Thane,Maharashtra
First Published :
August 06, 2025 7:31 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
ठाण्यातील वाहतुकीत मोठे बदल, घोडबंदर रोड 4 दिवस बंद राहणार, पर्यायी मार्ग कोणते?


