Mumbai Rain: कोकणात बदलला वारा, मुंबई-ठाण्यात घामाच्या धारा, हवामान विभागाचा पुन्हा इशारा
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
Mumbai Rain: कोकणात मान्सूनचा जोर काही प्रमाणात ओसरला होता. आता मात्र पुन्हा हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. मुंबई, ठाण्यातील हवामान अंदाज जाणून घेऊ.
पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटून गेले तरीही मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर आणि कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये गेले काही दिवस पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र दिसत आहे. श्रावण महिन्यात सरींची अपेक्षा असली तरी आज 6 ऑगस्ट रोजी कोकणात ढगाळ वातावरण असून, हलक्या पावसाच्या सरींची शक्यता काही भागांपुरती मर्यादित आहे. मुसळधार पावसाचा जोर मात्र कमी झाला आहे. यामुळे दिवस भर उकडणारे आणि दमट हवामान कायम राहणार आहे.
advertisement
advertisement
advertisement
पालघर जिल्ह्यात आज हलक्या स्वरूपाचा पाऊस आणि ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने इथे कोणताही अलर्ट दिलेला नाही. कमाल तापमान 30°C पर्यंत जाईल आणि किमान तापमान 25°C दरम्यान राहील. आर्द्रता अधिक असल्यामुळे उन्हाळ्यासारखा उकाडा जाणवू शकतो.25°C दरम्यान राहील. आर्द्रता अधिक असल्यामुळे उन्हाळ्यासारखा उकाडा जाणवू शकतो.
advertisement


