राज्यात मुलांपेक्षा मुलींची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे, अनेक ठिकाणी मुलांची लग्न होत नाहीत, अशा कुटुंबांची संख्याही जास्त आहे याचाच फायदा घेत अशा कुटुंबांना शोधून लुटणारी टोळी सध्या राज्यात सक्रिय झाली आहे. अशा मुलांना शोधून त्यांच्या सोबत बनावट लग्न लावून लुटणाऱ्या टोळीला श्रीगोंदा पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये महिलांचाही समावेश आहे.
advertisement
या प्रकरणामध्ये श्रीगोंदा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी आशा गौतम पाटील, सिमरन गौतम पाटील, शाहरुख फरीद शेख, दीपक पाडुरंग देशमुख, अर्जुन रामराव पाटील ऊर्फ करण गौतम पाटील, सचिन बलदेव राठोड ऊर्फ राजू रामराव राठोड आणि युवराज नामदेव यांना अटक केली आहे. हे लोक लग्नासाठी पैसे घेऊन फसवणूक करायचे.
या प्रकरणी 28 जून रोजी यवतमाळ येथील चौघांविरुद्ध श्रीगोंदे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात होता. या प्रकरणाच्या तपासात या टोळीत आणखी तिघांचा समावेश असल्याचं निष्पन्न झालं. यातील दोघे ओळख लपवून फसवणूक करत असल्याचं उघडकीस आलं आहे. या टोळीने आणखी लोकांची फसवणूक केली आहे का? याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.
