ती मागणी करत पोलीस पतीकडून छळ; लग्नानंतर 2 महिन्यातच महिलेनं मुंबईत संपवलं जीवन, वडिलांना केला हा शेवटचा मेसेज

Last Updated:

माहेरवरून दहा लाख रुपये आणावे यासाठी सासू आणि पतीकडून तिचा छळ केला जात असल्याने नवविवाहितेने हे टोकाचं पाऊल उचलण्याची माहिती आहे.

नवविवाहितेनं संपवलं आयुष्य
नवविवाहितेनं संपवलं आयुष्य
भुसावळ (इम्तियाज अहमद, प्रतिनिधी) : भुसावळ तालुक्यातील कुऱ्हा पानाचे येथील माहेर असलेल्या 24 वर्षीय नवविवाहितेने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. मुंबईतील मानपाडा परिसरात तिने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. माहेरवरून दहा लाख रुपये आणावे यासाठी सासू आणि पतीकडून तिचा छळ केला जात असल्याने नवविवाहितेने हे टोकाचं पाऊल उचलण्याची माहिती आहे.
जागृती सागर बारी असं आत्महत्या करणाऱ्या नवविवाहितेचं नाव आहे. याप्रकरणी मानपाडा पोलिसात पती सागर बारी नागपुरे आणि सासू शोभा बारी नागपुरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पत्नीच्या निधनानंतर पतीने अग्नीडाग देण्यासही नकार दिल्याने अखेर नवविवाहितेवर कुऱ्हा पानाचे इथे माहेरी भावाने अग्नीडाग देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले.
advertisement
आपल्या बहिणीला पतीने आणि सासूने गळफास देऊन मारल्याचा आरोप जागृतीच्या भावाने केला आहे. तसंच आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी जागृतीच्या भावाने केली आहे. कुऱ्हे पानाचे येथील शेतकरी गजानन भिका वराडे यांची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. त्यांनी आपली मुलगी जागृतीचा विवाह जळगावमधील पिंप्राळामधील सागर रामलाल बारी सोबत दोन महिन्यांपूर्वी 20 एप्रिल 2024 रोजी लावून दिला.
advertisement
सागर हा मुंबई पोलीस कर्मचारी आहे. सागरचे मित्र लग्नाला येणार असल्यामुळे एसी हॉलही बुक केला होता. लग्नात वराडे कुटुंबाने 7 लाखांपेक्षा जास्त खर्च केला. त्यानंतर मुलगी 21 जूनला मुंबईत पतीसह राहायला जाणार असल्याने तिचे आई-वडील पिंप्राळा गावात भेटायला गेला. जागृतीचे आई-वडील भेटायला आले तेव्हा तिची सासू शोभा रामलाल बारी हिने हुंडा दिला नाही, अशी तक्रार केली, तसंच मुंबईत घर घेण्यासाठी 10 लाख रुपये द्या, अशी मागणी केल्याचा आरोप वराडे कुटुंबाने केला आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
ती मागणी करत पोलीस पतीकडून छळ; लग्नानंतर 2 महिन्यातच महिलेनं मुंबईत संपवलं जीवन, वडिलांना केला हा शेवटचा मेसेज
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement