राज्यभरात ११२ नगरसेवक
२०२६ च्या या महापालिका निवडणुकांमध्ये AIMIM ने संपूर्ण महाराष्ट्रात ११२ पेक्षा जास्त जागा जिंकल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर, मालेगाव, नांदेड, धुळे, सोलापूर, नागपूर आणि अमरावती यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये पक्षाने आपली ताकद वाढवली आहे. या यशामुळे राज्यातील पारंपरिक राजकीय समीकरणं बदलली असून अनेक महापालिकांमध्ये सत्ता स्थापनेसाठी AIMIM हा 'किंगमेकर'च्या भूमिकेत गेला आहे.
advertisement
केवळ मुस्लीम नव्हे हिंदू अन् बौद्ध उमेदवारही निवडून आणले
या निवडणुकीचे सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे AIMIM कडून केवळ मुस्लीम उमेदवारच निवडून आले नाहीत. तर ओवेसींच्या पक्षाकडून निवडणूक लढवलेले ६ हिंदू आणि बौद्ध उमेदवार देखील विजयी झाले आहेत. त्यामुळे एमआयएमला आता मुस्लीम बहुल भागा पलीकडे जाऊन प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून येत आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये ३३ जागा जिंकून AIMIM ने भाजपच्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष होण्याचा मान मिळवला. येथे काकासाहेब काकडे (SC), अशोक हिवराले आणि विजयश्री जाधव यांनी विजय मिळवला. भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या नागपुरात AIMIM ने ६ जागांवर विजय मिळवला. त्यात पवन कोये (ST) आणि वर्षा डोंगरे या दोन हिंदू उमेदवारांच्या विजयाची मोठी चर्चा आहे. याशिवाय मुंबईत ८ जागा जिंकून पक्षाने पहिल्यांदाच खातं उघडले. गोवंडी-शिवाजी नगर परिसरातून विजय उबाले या दलित समुदायातील शिक्षणतज्ज्ञाने मिळवलेला विजय ऐतिहासिक ठरला.
