फडणवीसांचे सरकार उलथवण्यासाठी ज्याप्रमाणे विरोधी पक्षाचे नेते सामील आहेत, तसेच अजित पवारांचे आमदार खासदार त्यात सहभागी आहेत, असा गंभीर आरोप लक्ष्मण हाकेंनी केला. त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले, हाकेंच्या आरोपीला काही किंमत देत नाही,कोणाच्या आरोपीला किंमत द्यावी याला महत्त्व आहे.
मराठा आरक्षणाबाबत आम्ही सकारात्मक : अजित पवार
मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाविषयी बोलताना अजित पवार म्हणाले, सरकारने एक कमिटी नेमली आहे, त्यांनी त्यांच्याशी चर्चा करण्याची वेळ दिली आहे. प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार दिलेला आहे. सगळ्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे तो शांततेच्या मार्गाने व्हावा... आंदोलनकर्त्यांच्या मागण्या कशा मान्य करता येतील त्यावर कसा मार्ग काढता येईल याबाबत सरकार प्रयत्न करत आहे. न्यायालयाने दिलेले आदेश पाळले पाहिजे. आम्ही त्याच्यातून मार्ग काढू, मनापासून प्रयत्न करत आहोत. आरक्षणाबाबत आम्ही सकारात्मक आहोत.
advertisement
मनोज जरांगेंच्या प्रश्नावर अजित दादांनी उत्तर देणं टाळलं
राज्यात सर्व समाजाला त्यांचा त्यांचा न्याय मिळाला पाहिजे. अनेकजण राजकीय लोक सहभागी झाले आहेत. सरकार योग्य तो निर्णय घेईल काहीना काही मार्ग निघेल, कायद्याच्या नियमाच्या चौकटीत राहून मार्ग काढता येतो , सरकार शिष्टमंडळ त्यांना भेटायला जाईल, असेही अजित पवार म्हणाले. मात्र वेळ पडली तर मनोज जरांगे पाटील याच्यासोबत अजित पवार आरक्षणाबाबत मार्ग काढण्यासाठी जाणार का या प्रश्नावर अजित पवार यांनी बोलणं टाळले.
अजित पवार पुण्यात पण लक्ष मात्र मुंबईत
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार शुक्रवारी पुणे दौऱ्यावर होते. दौंडमध्ये असतानाही त्यांचे लक्ष सतत मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या जरांगे पाटलांच्या आंदोलनावरच असल्याचा प्रत्यय देणारा एक व्हिडीओ समोर आला. दौंडमधील एका हॉटेलला दिलेल्या भेटीदरम्यान पवार यांनी फोनवरून आंदोलनाच्या गर्दीची विचारपूस केली. “आंदोलनाला किती गाड्या आल्या? आता गाड्या थांबल्या का?” अशी विचारणा करतानाचा त्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
