जय पवार आणि ऋतुजा पाटील हे दोघं 5 डिसेंबर रोजी विवाहबंधनात अडकले आहेत.4 ते 7 डिसेंबर २०२५ या कालावधीत या खास विवाह सोहळा बहरीन येथे होणार आहे. या सोहळ्याला पवार–पाटील कुटुंबीयांकडून 400 पाहुण्यांना निमंत्रण पाठण्यात आल्याची माहिती आहे. सुप्रिया सुळे यांनी शेअर केले जय पवार यांच्या लग्नातले काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. जय पवार यांच्या वरातीत रोहित पवार यांचा झिंगाट डान्स सगळ्यांच लक्ष वेधून घेत आहे.
advertisement
व्हिडीओमध्ये कोण कोण दिसत आहे?
सुप्रिया सुळेंची मुलगी रेवती सुळे, मुलगा विजय सुळे, उपमुख्यमंत्री आणि जयचे वडील अजित पवार, आमदार रोहित पवार आणि त्यांची संपूर्ण फॅमिली वरातीत डान्स करताना दिसत आहे.त्याचबरोबर युगेंद्र पवार आणि त्यांची पत्नी तनिष्का कुलकर्णी देखील दिसत आहे. या विवाह सोहळ्यासाठी मागील काही दिवसांपासून पवार–पाटील कुटुंबीयांची आणि पाहुण्यांची तयारी जोरात सुरू होती. संपूर्ण कार्यक्रम परदेशात मोठ्या उत्साहात पार पडत आहे याची झलक दाखवणारे फोटो व्हिडीओ समोर आले आहेत.
जय व ऋतुजाच्या लग्नपत्रिकेनुसार, पवार कुटुंबाने या दोघांच्या लग्नासाठी बहरीन येथे 4 दिवसांचे पारंपरिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते.. यात 4 डिसेंबर रोजी मेहेंदी, 5 डिसेंबर रोजी हळदी, वरात व लग्नसोहळा, 6 डिसेंबर रोजी संगीत व 7 डिसेंबर रोजी स्वागत समारंभ या कार्यक्रमांचा समावेश आहे. जय पवार व ऋतुजा पाटील यांच्या विवाह सोहळ्याची मागील काही दिवसांपासून जय्यत तयारी सुरू होती.
