TRENDING:

Ajit Pawar : ड्युटीवर असताना मद्यसेवन, पायलट दोनदा बडतर्फ, अजितदादांच्या कॅप्टनचा हादरवणारा ट्रॅक रेकॉर्ड!

Last Updated:

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. बुधवारी सकाळी अजित पवार मुंबईहून बारामतीला जात असताना बारामती विमानतळावर त्यांचं विमान कोसळलं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
प्रशांत लिला रामदास, प्रतिनिधी
ड्युटीवर असताना मद्यसेवन, पायलट दोनदा बडतर्फ, अजितदादांच्या कॅप्टनचा हादरवणारा ट्रॅक रेकॉर्ड!
ड्युटीवर असताना मद्यसेवन, पायलट दोनदा बडतर्फ, अजितदादांच्या कॅप्टनचा हादरवणारा ट्रॅक रेकॉर्ड!
advertisement

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. बुधवारी सकाळी अजित पवार मुंबईहून बारामतीला जात असताना बारामती विमानतळावर त्यांचं विमान कोसळलं. अजितदादांसोबतच विमानाचे दोन्ही पायलट, कॅबिन क्रू आणि सुरक्षारक्षक म्हणून असलेले पोलीस असा एकूण पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

अजितदादांसोबत विमानामध्ये कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक, केबिन स्टाफ पिंकी माळी आणि पोलीस विदीप जाधव होते. धुक्यामुळे रनवे दिसण्यात अडचणी येत होत्या, त्यामुळे पायलटने काही वेळ विमान हवेमध्येच ठेवलं, पण त्यानंतर जेव्हा पायलटला रनवेचा अंदाज आला तेव्हा त्याने लॅन्डिंगचा प्रयत्न केला, पण लॅन्डिंगच्या वेळी अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. विमानाचा ब्लॅक बॉक्स उघडल्यानंतरच या अपघाताचं खरं कारण समोर येईल.

advertisement

पायलटबद्दल धक्कादायक माहिती

दरम्यान अजित पवारांच्या विमानाचे कॅप्टन सुमित कपूर यांच्याबाबत धक्कादायक माहिती समोर येत आहे. ड्युटीवर असताना मद्यसेवन केल्यामुळे कॅप्टन सुमित कपूर हे दोनदा सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते.

कॅप्टन सुमित कपूर यांच्याविरोधात ड्युटीवर असताना मद्यसेवन केल्याची दोन गंभीर प्रकरणे समोर आली आहेत. पहिली घटना ही 2010 सालातील असून, त्यावेळी ते ड्युटीवर असताना मद्यसेवन केलेल्या अवस्थेमध्ये आढळून आलं होतं. या घटनेनंतर संबंधित विमानसेवेने सुमित कपूर यांना कामावरून काढून टाकलं होतं.

advertisement

यानंतर 2017 साली पुन्हा एकदा सुमित कपूर ड्युटीवर असताना पॉझिटिव्ह आढळले होते. मद्यप्राशन केल्याचं दुसऱ्यांदा आढळल्यानंतर सक्षम प्राधिकरणाने त्यांना 3 वर्षांसाठी निलंबित केलं, अखेरीस त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आलं, त्यानंतर काही काोळ त्यांनी फ्रीलान्स पद्धतीने काम केलं. गेल्या 5 वर्षांपासून सुमित कपूर हे व्हीएसआर व्हेन्चर्स या कंपनीमध्ये कार्यरत होते.

अजितदादांवर गुरूवारी अंत्यसंस्कार

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
आल्याचे दर वाढले, शेवगा आणि डाळिंबाला काय मिळाला भाव? इथं चेक करा
सर्व पहा

अजित पवार यांच्या पार्थिवावर गुरूवारी सकाळी 11 वाजता बारामतीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, त्याआधी विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयात अजित पवारांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. अजितदादांच्या अंत्यसंस्काराला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार आहेत. अजितदादांच्या निधनामुळे महाराष्ट्रात 3 दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ajit Pawar : ड्युटीवर असताना मद्यसेवन, पायलट दोनदा बडतर्फ, अजितदादांच्या कॅप्टनचा हादरवणारा ट्रॅक रेकॉर्ड!
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल