एकीकडे अजित पवारांचा मृत्यू झाल्यानंतर आता त्यांच्यासंबंधित अनेक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहेत. विमानात बसण्याआधी अजित पवारांचं पत्नी सुनेत्रा पवारांशी फोनवरून बोलणं झालं होतं. सकाळी नाष्टा करत असताना अजित पवारांनी सुनेत्रा पवारांशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी खासदार असलेल्या आपल्या पत्नीला खास सल्ला देखील दिला होता. ज्यावेळी फोनवर बोलणं झालं होतं, त्यावेळी अजित पवारांसोबत त्यांचे पीए आणि सुरक्षा कर्मचारी होते. दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालं होतं, याबाबतचा खुलासा त्यांनी स्वत: केला आहे.
advertisement
खरं तर, बुधवारी बारामतीत अजित पवारांच्या चार सभांचं आयोजन केलं होतं. त्यामुळे ते सकाळी लवकर उठून बारामतीला रवाना झाले होते. बारामतीला निघण्यापूर्वी अजित पवारांनी आपल्या देवगिरी बंगल्यावर नाष्टा केला होता. नाष्टा करत असताना त्याने पत्नी सुनेत्रा पवारांना फोन केला होता. यावेळी दोघांमध्ये संसदेत सुरू असलेल्या बजेट सत्रावर चर्चा झाली. राष्ट्रपतींचं अभिभाषण लक्ष देऊन ऐक, असा सल्ला अजित पवारांनी खासदार असलेल्या सुनेत्रा पवारांना दिला होता.
नाष्टा झाल्यानंतर अजित पवार सकाळी सात वाजून १० मिनिटांनी देवगिरी बंगल्यावरून मुंबई विमानतळाकडे गेले. यावेळी त्यांच्यासोबत सुरक्षा कर्मचारी आणि पीए देखील होते. पण विमानतळावर गेल्यानंतर हे सर्वजण रिटर्न आले. अजित पवार आपले सुरक्षा रक्षक विदीप जाधव यांना घेऊन स्पेशल चार्टर विमानाने बारामतीला आले. पण लँडिंगदरम्यान झालेल्या अपघातात त्यांचा दुर्दैवी अंत झाला.
