रायगडमधील कर्जतमध्ये हा निर्णय घेण्यात आला. रायगडमध्ये शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांमध्ये जोरदार संघर्ष सुरू आहे. पालकमंत्री पदाच्या वादाने या राजकीय संघर्षाला अधिकच धार आली आहे. राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे आणि शिंदे गटाचे भरत गोगावले यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यातच कर्जतमध्येही शिंदे गट विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गटातही तीव्र मतभेद दिसून आले.
advertisement
त्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर परिषद निवडणुकीसाठी अजित पवार गट आणि उद्धवसेनेची एकत्र आघाडी स्थापन करण्यात आली आहे. दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी शनिवारी एकत्र येऊन एक दिलाने लढविण्याचा आणि निवडणुकीत विजय मिळवण्याचा निर्धार व्यक्त केला.
रेडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, भरत भगत, अशोक भोपतराव, दीपक श्रीखंडे यांच्यासह उद्धवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत, भिवसेन बडेकर, प्रदीप ठाकरे यांसह इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
गेल्या निवडणुकीत सुधाकर घारे हे अपक्ष म्हणून लढले होते, मात्र त्यांना निसटता पराभव स्वीकारावा लागला होता. तर, नितीन सावंत यांनी उद्धवसेनेकडून निवडणूक लढवली होती आणि त्यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. यापुढे दोन्ही पक्ष एकत्र येऊन आगामी निवडणुकीत मोठ्या विजयाच्या दिशेने वाटचाल करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तर, दुसरीकडे शिंदे गटाला आपली रणनीती नव्याने आखावी लागणार आहे.
