पुणे : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन आज पार पडले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते हे उद्घाटन होणार होते. मात्र अजित पवार यांची प्रकृती अचानक खालावली. त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांचे आजचे त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे, त्यामुळे त आज उपस्थित राहिले नाही. मात्र अजित पवारांनी शुभेच्छा संदेश पाठवला. या संदेशात त्यांनी आमदार सुनिल शेळके यांचे कौतुक केले. सुनील शेळके भाषण लय भारी आहे, असे म्हणत स्तुती केली.
advertisement
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मावळचे आमदार सुनील शेळके यांचे आपुलकीचे नाते सर्वांनाच माहीत आहे. याच स्नेहाच्या धाग्यातून 'श्री शिवशंभू स्मारक' प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा आज तळेगाव दाभाडे येथे आयोजित करण्यात आला होता. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यासाठी केंद्रीय वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ, पिंपरी आमदार आण्णा बनसोडे, कृषी मंत्री दत्ता भरणे, विधानपरिषद आमदार अमित गोरखे, मावळ आमदार सुनील शेळके या वेळी उपस्थित होते. या सोहळ्यात एकूण ७६१ कोटी १७ लाख रुपयांच्या विकासकामांचे लोकार्पण करण्यात आले.
अजित पवार का आले नाही?
मूळ कार्यक्रम अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडणार होता. मात्र काल रात्री नगरमध्ये कर्डिले साहेबांना भेटल्यानंतर दादांना अचानक तब्येतीचा त्रास झाला. त्यामुळे दादांना विश्रांती घ्यावी लागली आणि कार्यक्रमास येणे शक्य झाले नाही.
काय म्हणाले सुनील शेळके?
आमदार सुनील शेळके म्हणाले, येत्या काळात तालुक्याचा सर्वांगीण विकास होताना एक चांगलं काम करणं माझी देखील जबाबदारी आहे. मागच्या काळामध्ये जो काही विकास कामाला निधी आला या निधीतून आपण काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु तालुक्याचा विकास करायचा तर महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातला सर्वात सुजलाम तालुका म्हणून आम्हाला मावळ तालुका पाहायला मिळेल. तळेगाव शहराला 24 तास मुबलक पाणीपुरवठा बंद पाईपलाईन ही योजना देखील राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू करता येणार आहे.