TRENDING:

तिसऱ्या महापालिकेसाठी पवार काका-पुतणे एकत्र? पुणे पिंपरी चिंचवडनंतर याठिकाणी हालचालींना वेग

Last Updated:

पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगर पालिका निवडणुकीत आधीपासून अजित पवार आणि शरद पवार एकत्र निवडणूक लढणार असल्याची शक्यता आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: राज्यात महानगर पालिकेच्या निवडणुकांची घोषणा होताच महायुतीसह महाविकास आघाडीकडून हालचालींना वेग आला आहे. कोणत्या ठिकाणी कशी निवडणूक लढायची? कुणासोबत युती किंवा आघाडी करायची? यासाठी सर्वच पक्षांकडून चाचपणी सुरू आहे. राज्यात महायुती सत्तेत असली तरी महापालिका निवडणुकीत अनेक ठिकाणी हे तिन्ही पक्ष एकमेकांविरोधात लढताना दिसत आहेत. शिवसेना शिंदे गट आणि भाजपकडून एकमेकांच्या जागांवर दावे केले जातायत. या दोन्ही पक्षात प्रचंड रस्सीखेच बघायला मिळत आहेत.
News18
News18
advertisement

अशात महायुतीतील तिसरा पक्ष असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीची मात्र सगळीकडे परवड होत आहेत. अशा स्थितीत आगामी निवडणुकीत अजित पवार आणि शरद पवार एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगर पालिका निवडणुकीत आधीपासून अजित पवार आणि शरद पवार एकत्र निवडणूक लढणार असल्याची शक्यता आहे. यावर अद्याप शिक्कामोर्तब झालं नसताना आता तिसऱ्या महापालिकेसाठी पवार काका पुतणे एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

advertisement

पुणे आणि पिंपरी चिंचवडनंतर आता मुंबईतही अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार असल्याचं बोललं जातंय. मुंबईत एकत्र निवडणूक लढण्याचा प्रस्ताव द्या, असं अजित पवारांनी शरद पवार गटाला सांगितल्याची माहिती सूत्रांकडून दिली जात आहे. अजित पवार गट शरद पवारांसोबत आला, तर मुंबईत महाविकास आघाडीची आणखी ताकद वाढण्याची शक्यता आहे.

खरं तर, राष्ट्रवादी अजित पवार गटाला मुंबईत महायुतीत योग्य त्या जागा मिळणार नाहीत. शिवाय शिवसेना शिंदे गट आणि भाजपही राष्ट्रवादीला सोबत घेण्यास फारसं उत्सुक नाही. त्यामुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला मुंबईत एकत्र निवडणूक लढण्याचा प्रस्ताव द्या, असे अजित पवार यांनी सांगितल्याची सुत्रांची माहिती आहे. असं झाल्यास पुणे, पिंपरी-चिंचवड पाठोपाठ मुंबईतही दोन राष्ट्रवादी एकत्र लढताना दिसतील.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
काळ्या तिळाची झाली भाव वाढ, आले आणि केळीचे गुरुवारी काय दर? Video
सर्व पहा

असं असलं तरी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष मात्र मुंबईत शिवसेना ठाकरे गट आणि मनसेबरोबर एकत्र निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचं कळतं. त्यामुळे पक्ष फोडून महायुतीत सामील झालेल्या अजित पवारांना शरद पवार सोबत घेणार का? तसा प्रस्ताव देणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
तिसऱ्या महापालिकेसाठी पवार काका-पुतणे एकत्र? पुणे पिंपरी चिंचवडनंतर याठिकाणी हालचालींना वेग
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल