TRENDING:

Sangrap Jagtap : संग्राम जगताप 'हाजिर हो'; अजित पवारांचं फर्मान, तातडीने मुंबईला बोलावलं

Last Updated:

अजितदादांच्या आदेशानंतर संग्राम जगताप तडकाफडकी मुंबईत दाखल होत अजित पवारांची भेट घेतली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई :  कट्टर हिंदुत्ववादी नेता बनू पाहाणाऱ्या राष्ट्रवादीच्या आमदार संग्राम जगताप यांना तातडीनं मुंबई वर्दी देण्याचं फर्मान अजित पवारांनी सोडलं. अजितदादांच्या आदेशानंतर संग्राम जगताप तडकाफडकी मुंबईत दाखल होत अजित पवारांची भेट घेतली. पक्षविरोधी भूमिका घेतल्यानं अजित पवारांनी संग्राम जगतापांना दम भरलाय.
News18
News18
advertisement

राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप काही दिवसांपूर्वी सोलापूरच्या करमाळ्यात काढण्यात आलेल्या हिंदू आक्रोश मोर्चात मुस्लिमांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता. येत्या दिवाळीत मुस्लिमांवर बहिष्कार घालण्याचं आवाहन आमदार महोदयांनी केलं होतं. पक्षाच्या विचारधारेच्या विरोधात भूमिका घेतल्यानं अजित पवारांनी तीव्र नाराजी व्यक्त करत जगतापांना नोटीस पाठवली. मात्र त्यानंतरही जगताप थांबले नाही. संगमनेरमध्ये निघालेल्या हिंदू आक्रोश मोर्चातही त्यांनी मुस्लिमांविरोधात मुक्ताफळं उधळली. संग्राम जगताप यांनी अलिकडच्या काळात केलेल्या या विधानाबाबत शरद पवारांनी नापसंती व्यक्त केलीय.

advertisement

संग्राम जगताप यांचा निषेध

पूर्वी आपल्या पक्षात असणारे एक आमदार सध्या जातीजातीत तणाव निर्माण होईल अशा प्रकारची वक्तव्य करत आहेत. हे अत्यंत चुकीचं आहे. जातीय सलोखा ठेवा...स्थानिक पातळीवर, राज्य पातळीवर बोलत असताना जातीवाचक बोलू नका...बोलताना प्रेमाची भाषा वापरा..आपण करत असलेल्या विधानामुळे जातीय सलोखा बिघडणार नाही याची काळजी घ्या, असं शरद पवारांनी म्हटलंय.

advertisement

हिंदुत्वाची भूमिका घेतल्यानं अनेकांच्या भुवया उंचवल्या

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
दिवाळीसाठी स्टायलिश कुर्तीज, किंमत 300 रुपये,मुंबईतील या मार्केटमध्ये करा खरेदी
सर्व पहा

अजित पवारांच्या इशाऱ्यानंतर संग्राम जगताप शांत बसले नाहीत. त्यामुळे अजित पवारांनी जगतपांना थेट मुंबईला बोलावून घेतलं. संग्राम जगतापांनी अचानक हिंदुत्वाची भूमिका घेतल्यानं अनेकांच्या भुवया उंचवल्या. यामागे जगतापांचा काय हेतू आहे याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. आता अजितदादांच्या भेटीच्या फर्मानानंतर आता संग्राम जगताप आपली प्रखर हिंदुत्वावादी भूमिका कायम ठेवतात की पुन्हा राष्ट्रवादीच्या विचारधारेला जवळ करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Sangrap Jagtap : संग्राम जगताप 'हाजिर हो'; अजित पवारांचं फर्मान, तातडीने मुंबईला बोलावलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल