उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आयपीएस अंजना कृष्णा यांच्या व्हायरल फोन कॉल संदर्भात एक मोठा दावा माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केला आहे. अजित पवार यांना लावलेला फोन कॉल हा त्या गावातील कार्यकर्त्यांनी नव्हे तर एका मध्यस्थ्याने लावला, त्यानंतर कॉन्फरन्स कॉलवरून अजितदादांनी डीवायएसएपी अंजना कृष्णा यांच्याशी संवाद साधल्याचे त्यांनी म्हटले.
advertisement
धैर्यशील मोहिते पाटील यांनी म्हटले की, मध्यस्थांच्या दबावापोटी अजितदादा यांना प्रोटोकॉल सोडून आयपीएस अधिकाऱ्याशी बोलावे लागले असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच हे काम मुरूम माफिया करत आहेत. माढा तालुक्यातील ही परिस्थिती बीडपेक्षा अधिक वेगळी आहे. कुर्डू गावचे अनेक पॅटर्न असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे खासदार मोहिते पाटील यांनी केलेल्या दाव्यातील तो मध्यस्थ कोण? अशी चर्चा यानिमित्ताने पुढे आली. तर नक्की कुणी अजित पवार यांना अडचणीत आणण्यासाठी कॉन्फरन्स कॉल केला. असाही सवाल यानिमित्ताने पुढे आला आहे.
माढा तालुक्यातील कुर्डू गावात सरकारी जमिनीवरून मोठ्या प्रमाणावर मुरूम चोरीला केला आहे. ह्या मुरुमाची चौकशी करावी अशी मागणी देखील खासदार धैर्यशील मोहिते यांनी केली. याबाबत ऑनलाइन परवानग्या मिळतात. असे असताना महिला अधिकाऱ्यांच्या मागे चौकशीचा ससेमेरा लावण्याचे काम होत असून तात्काळ मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे, अशी मागणीदेखील त्यांनी केली. बीडपेक्षा अधिक असणारी मुरूम माफियांचा माढा तालुक्यातील दहशत संपवावी अशीही मागणी यावेळी खासदार मोहिते पाटील यांनी केली आहे.