भाजपची चक्क एमआयएमशी हातमिळवणी
भाजपने अकोट नगरपंचायतीमध्ये सर्वाधिक 11 जागा जिंकल्या मात्र, 35 जागा असलेल्या नगरपंचायतीमध्ये त्यांना स्वबळावर सत्ता मिळाली नाही. सत्तेत येण्यासाठी त्यांना युतीची गरज होती. पण काय... भाजपने विरोधी पक्षात सर्वाधिक पाच जागा जिंकलेल्या एमआयएमशी हातमिळवणी केली अन् सत्तेच्या चाव्या घेतल्या. भाजपच्या नेतृत्वात अकोट विकास मंच स्थापन करण्यात आला होता. आता विरोधी पक्षातील एमआयएमलाच या विकास मंचात सामील करून घेण्यात आलं आहे.
advertisement
अकोट विकास मंच
भाजपच्या आघाडीत ठाकरेंची शिवसेना, शिंदेंची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि बच्चू कडूंचा प्रहार जनशक्ती पक्ष सहभागी आहे. अशातच आता एमआयएमची देखील एन्ट्री झाली आहे. अकोट नगरपालिकेत काँग्रेसचे 6 आणि वंचितचे 2 सदस्य विरोधी पक्षात आहेत. विशेष म्हणजे भाजपने काँग्रेसला सोबत न घेता एमआयएमला टाळी दिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातंय.
इतिहास जलील म्हणाले...
दरम्यान, मला अकोटमध्ये झालेल्या प्रकाराबद्दल माहिती नाही. मी तेथील प्रभारींना लिखित माहिती मागवली आहे. दहा मिनिटांमध्ये माहिती देण्याचं त्यांना सांगितला आहे त्यामुळे मी दहा मिनिटांनी आपल्या सोबत सविस्तर बोलतो. भाजपाच्या विरोधात आमचे राजकारण आहे आणि ते राहणारच, असं माजी खासदार इतिहास जलील यांनी म्हटलं आहे.
