विदर्भासाठी भाजपचा नवा प्लान
केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अकोल्यात एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली. विदर्भातल्या 6 लोकसभा मतदार संघाचा आढावा घेणारी ही बैठक होती. 12 वाजून 52 मिनीटांनी अमित शहा यांची ही बैठक सुरू झाली होती तर 1 वाजून 40 मिनिटांपर्यंत ही बैठक सुरू होती. या बैठकीत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि पालकमंत्री विखे पाटील प्रामुख्याने उपस्थित होते. अकोला, बुलढाणा, वाशिम-यवतमाळ, अमरावती, वर्धा, चंद्रपूर या लोकसभा मतदारसंघातील भाजप आणि महायुतीचे उमेदवार कशा प्रकारे निवडून येतील यावर अमित शहा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं तर सहाही लोकसभेच्या कोणत्याही संभाव्य उमेदवारांबद्दल या बैठकीत चर्चा झाली नाही.
advertisement
बैठकीत उपस्थितांना लोकसभा प्रवास योजना या नावाचं पुस्तक देण्यात आलं. या पुस्तकात पत्रकार परिषदेत बोलताना काय काळजी घेतली पाहिजे या संदर्भात सुद्धा मार्गदर्शन करण्यात आलं आहे. त्याच प्रमाणे पत्रकारांना कोणती माहिती देण्यात यावी आणि कोणती नाही या संदर्भात सुद्धा सूचना देण्यात आल्या आहेत. अबकी बार 400 पार चा नारा या बैठकीत देण्यात आला आहे. तर 6 ही लोकसभा मतदार संघात भाजपच्याच नाही तर महायुतीतील प्रत्येक उमेदवारांना निवडून आणण्याची जबाबदारी अमित शहा यांनी उपस्थितांना दिली.
वाचा - अमित शाहांनी महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं; शरद पवारांवर बरसले
जळगावच्या सभेतून पवारांवर हल्ला
‘शरद पवारांना 50 वर्ष जनता सहन करतेय, पवारांनी फक्त 5 वर्षांचा हिशोब द्यावा. महाराष्ट्राची जनता 5 दशकं पवारांचं ओझं वाहत आहे’, असं म्हणत अमित शाह यांनी शरद पवारांवर थेट हल्ला केला. ‘महाविकासआघाडीच्या तीनचाकी ऑटोचे तीनही चाकं पंक्चर. महाराष्ट्राला पंक्चरवाली ऑटो विकास देऊ शकते का? एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपच महाराष्ट्राला विकास देऊ शकते’, असं म्हणत अमित शाहांनी महाविकासआघाडीवर टीका केली.
