Amit Shah : अमित शाहांनी महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं; शरद पवारांवर बरसले

Last Updated:

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्रात प्रचारासाठी आले आहेत. जळगावच्या सभेत अमित शाह यांनी शरद पवारांवर घणाघाती टीका केली आहे, तर इंडिया आघाडीवरूनही अमित शाहांनी उद्धव ठाकरे, सोनिया गांधींवर निशाणा साधला.

अमित शाहांनी महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं; शरद पवारांवर बरसले
अमित शाहांनी महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं; शरद पवारांवर बरसले
जळगाव : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्रात प्रचारासाठी आले आहेत. जळगावच्या सभेत (Loksabha Elections 2024) अमित शाह यांनी शरद पवारांवर घणाघाती टीका केली आहे, तर इंडिया आघाडीवरूनही अमित शाहांनी (Amit Shah) उद्धव ठाकरे, सोनिया गांधींवर निशाणा साधला. जे पक्ष स्वत:च्या पक्षात लोकशाही ठेवत नाही, जे पक्ष परिवारवादातून चालतात, ते पक्ष देशाच्या लोकशाहीला मजबूत करू शकतील का? असा सवाल अमित शाह यांनी विचारला आहे.
'मोदींच्या समोर जे गठबंधन झालं आहे ते कोण आहेत? इंडिया आघाडी फक्त मुलामुलींसाठी आहे. सोनिया गांधींना राहुल गांधींना पंतप्रधान बनवायचं आहे, उद्धव ठाकरेंना आदित्यला तर शरद पवारांना मुलीला मुख्यमंत्री बनवायचं आहे. ममता दिदींना भाच्याला तर स्टालिनला मुलाला मुख्यमंत्री बनवायचं आहे. यामध्ये तुमच्यासाठी कुणी आहे का? पण तुमच्यासाठी नरेंद्र मोदी आहेत', असं म्हणत अमित शाह यांनी इंडिया आघाडीवर हल्लाबोल केला.
advertisement
शरद पवारांवर थेट हल्ला
'शरद पवारांना 50 वर्ष जनता सहन करतेय, पवारांनी फक्त 5 वर्षांचा हिशोब द्यावा. महाराष्ट्राची जनता 5 दशकं पवारांचं ओझं वाहत आहे', असं म्हणत अमित शाह यांनी शरद पवारांवर थेट हल्ला केला.
'महाविकासआघाडीच्या तीनचाकी ऑटोचे तीनही चाकं पंक्चर. महाराष्ट्राला पंक्चरवाली ऑटो विकास देऊ शकते का? एकनाथ जी आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वात भाजपच महाराष्ट्राला विकास देऊ शकते', असं म्हणत अमित शाहांनी महाविकासआघाडीलाही टोला लगावला.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Amit Shah : अमित शाहांनी महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं; शरद पवारांवर बरसले
Next Article
advertisement
Silver Price Prediction: गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढलं! अडीच लाखांवर पोहोचलेली चांदी आता गडगडणार? एक्सपर्टने काय म्हटलं?
गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढलं! अडीच लाखांवर पोहोचलेली चांदी आता गडगडणार? एक्सपर्ट
  • मागील वर्षात चांदीने गुंतवणूकदारांना छप्परफाड रिटर्न दिले.

  • चांदीच्या दरात मागील काही दिवसापूर्वी चांगलीच उसळण दिसून आली होती.

  • त्यानंतर गुंतवणूकदारांकडून गुंतवणुकीसाठी चांदीच्या पर्यायाकडे प्राधान्य दिले जात

View All
advertisement