TRENDING:

छ.संभाजीनगरमध्ये युती तोडण्यामागे व्हिलन कोण? मुख्यमंत्री फडणवीसांनी थेट सगळं सांगितलं

Last Updated:
impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अविनाश कानडजे, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

छत्रपती संभाजीनगर: राज्यभरात महापालिका निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी टॉक शोच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात जाऊन जनतेशी संवाद साधण्याचा धडाका लावला आहे. 'छत्रपती संभाजीनगर पालिका निवडणुकीमध्ये आम्ही शिवसेनेसोबत युती करण्याचा खूप प्रयत्न केला. चार जागा कमी झाल्या तरी युती करा पण दुर्दैवाने त्यांच्या वागण्यामुळे युती तुटली' असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेच्या नेत्यांनाचा युती न करण्यासाठी व्हिलन ठरवलं आहे.

advertisement

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानाला अवघे आठ दिवस शिल्लक असताना भाजपकडून प्रचारासाठी हायटेक फंडा राबवण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा डिजिटल Talk Show आज गुरुवारी आयोजित करण्यात आला होता. हा show एकाच वेळी शहरातील तब्बल ९० वॉर्डात थेट प्रसारित करण्यात आला होता. चौका-चौकात मोठ्या LED स्क्रीन लावण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय घडामोडीपासून ते शहराच्या विकास कामावर भाष्य केलं.

advertisement

'आमचा मित्रपक्ष शिवसेनेसोबत आम्हाला युती करायची होती मी खूप प्रयत्न केले. दररोज आम्हाला नवीन प्रस्ताव दिल्या जात होते म्हणून आमची येथील स्थानिक नेते कंटाळले होते. इथल्या स्थानिक नेत्यांमध्ये शिवसेना विभागली गेली, गट पडले होते त्यामुळे प्रत्येक नेता आक्षेप घेत होता. त्यांनी त्यांच्या अपेक्षा भांडणातून युती तोडून टाकली. मी सांगितलं होतं, ४ जागा कमी झाल्या तरी युती करा, पण दुर्दैवाने त्यांच्या वागण्यामुळे युती तुटली, असं म्हणत फडणवीस यांनी शिवसेनेच्या नेत्यांवर युतीवर तोडण्यास कारणीभूत ठरवलं.

advertisement

जे भगव्याची पाठराखण करतील...

तसंच, "आता ही आमची लढत मैत्रीपूर्णच आहे. संभाजीनगरमध्ये एक नंबरचा पक्ष हा भाजपा असेल आणि आमच्या मागे मागे आमचे मित्र पक्षच असेल. आम्ही एकटे या ठिकाणी बहुमत मिळवून दाखवू,  जे भगव्याची पाठ राखण करतील त्यांना आम्ही सोबत घेऊ' असंही फडणवीस म्हणाले.

"कायद्याचे राज्य पाहिजे आणि वाईट प्रवृत्तीच्या विचार आहे, त्यांना ठेचलेच पाहिजे"

advertisement

"माझ्यातला नेता आणि गृहमंत्री वेगळा नाही.  कुठल्याही शहराचा आर्थिक विकास तेव्हाच होतं जेव्हा कायदा सुव्यवस्था चांगली राहते आणि शांती राहते.  या अगोदर दोन वेळेस दंगल झाली होती. त्याचा परिणाम उद्योजकांच्या मनावर झाला.  कायद्याचे राज्य असले पाहिजे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. एमआयडीसीमध्ये लोकांना ब्लॅकमेल करण्याचे काम सुरू होते, त्यांच्यावर आम्ही कारवाई केली. कायद्याचे राज्य पाहिजे आणि वाईट प्रवृत्तीच्या विचार आहे, त्यांना ठेचलेच पाहिजे, असं म्हणत बुधवारी इम्तियाज जलील यांच्यावर झालेल्या हल्ल्यावर फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली.

एकवेळ घरी बसू पण MIM सोबत युती कधीच नाही!

अकोट नगरपरिषदेमध्ये आमची आणि राष्ट्रवादीची युती होती, राष्ट्रवादीने त्या युतीमध्ये एमआयएमचे नगरसेवक जोडून घेतले, त्यामुळे आमच्या सोबतही त्यांच्यासोबत युती झाली. पण काही झाले तरी एमआयएमसोबत आमची युती नाही म्हणून त्यांना आम्ही तात्काळ बाहेर काढले, आमदारांना तुम्हाला आम्ही निलंबित का करू नये, अशी नोटीस दिली आहे. एक वेळेस आम्ही घरी बसू पण एमआयएम सोबत युती नको, असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

समृद्धी महामार्गासाठी लोकांनी मला मूर्खात काढलं पण आज...'

"समृद्धी महामार्ग हा माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे. 2001 मधेच मी सांगितलं होतं की, शहरांना जोडणारी कम्युनिकेशन सिस्टिम मिळाली पाहिजे, मी मुख्यमंत्री झालो तेव्हा हा समृद्धी करायचा मी ठरवलं, तेव्हा मला मूर्खात काढलं पण ते मी करून दाखवलं. समृद्धी केला तेव्हा नागपूर ते मुंबईपर्यंत सरळ रेष ओढली.  जमीन खरेदी करणे हा मोठा मुद्दा होता, लोक जागा देतील हे मला माहिती होते. पण त्यावेळी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी समृद्धीसाठी जागा देऊ नये म्हणून सभा घेतल्या, मी तेव्हा लोकांना पाचपटीने जास्त पैसे दिले आणि लोकांनी त्या जागा दिल्या.

"उद्धव ठाकरे यांनी जळगावात सभा घेऊन सांगितलं होतं की, तुम्ही जागा देऊ नका, त्याच गावाने एका दिवसात समृद्धी महामार्गासाठी संपूर्ण जागा दिली, त्यानंतर 9 महिन्यात पूर्ण जागा मिळाल्या.  आता हा समृद्धी महामार्ग सर्वांना हवासा झाला आहे.  नाशिक समृद्धी महामार्गापासून वाढवन बंदरापर्यंत एका तासात जाऊ अशी कनेक्टिव्हिटी करायची आहे' असं म्हणत फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.

'मागच्या जन्मात पाप करणारा माणूस नगरसेवक होतो'

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
गुलाबाच्या शेतीमध्ये घेतलं बोराचं आंतरपीक, उत्पन्न मिळणार लाखात, कशी केली शेती?
सर्व पहा

"महापौर आणि नगरसेवकाचा जॉब फॉर डिमांडिंग आहे. छोट्या छोट्या कामासाठी नगरसेवक महापौर यांना लोक शिव्या देतात.  मी या दोन्ही पदावर राहिलो आहे. मागच्या जन्मात पाप केलेला माणूस नगरसेवक बनतो आणि महापाप केलेला महापौर बनतो.  या महापालिकेमध्ये ट्रान्सपरन्सी मला दिसत नाही. मी जर महापौर झालो तर मी ट्रान्सपरन्सी घेऊन येईल, असं उत्तर फडणवीस यांनी दिलं.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
छ.संभाजीनगरमध्ये युती तोडण्यामागे व्हिलन कोण? मुख्यमंत्री फडणवीसांनी थेट सगळं सांगितलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल