TRENDING:

IPS Anjana Krishna: ट्विट केले, अंगलट आले, दबाव आल्यावर बिनशर्त दिलगिरी, अमोल मिटकरींची कोलांटउडी

Last Updated:

Amol Mitkari : राष्ट्रीय पातळीवरील माध्यमांनीही अजित पवार यांना लक्ष्य केल्यानंतर या विषयावर पडदा टाकणे आवश्यक होते. प्रथमत: अजित पवार यांनी स्पष्टीकरण देऊन एक पाऊल मागे आले. त्यानंतर पक्षातून दबाव आल्यानंतर अमोल मिटकरी यांनाही दिलगिरी व्यक्त करावी लागली, असे सूत्रांनी सांगितले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षांना तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना व्हिडीओ कॉल करायला लावणाऱ्या आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांचे जात प्रमाणपत्र तपासावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली होती. आपल्या सर्वोच्च नेत्याच्या आत्मसन्मानाला धक्का पोहचल्याने थोडक्यात 'इगो हर्ट' झाल्याने चवताळलेल्या अमोल मिटकरी यांनी आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या जात प्रमाणपत्र चौकशीची मागणी यूपीएससीकडे करून हा विषय देश पातळीवर नेला. राष्ट्रीय पातळीवरील माध्यमांनीही अजित पवार यांना लक्ष्य केल्याने, पक्षातून दट्ट्या बसताच बिनशर्त दिलगिरीचे ट्विट करून याविषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न अमोल मिटकरी यांनी केला आहे.
अंजना कृष्णा-अमोल मिटकरी
अंजना कृष्णा-अमोल मिटकरी
advertisement

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्याच्या पोलीस उपअधीक्षक अंजना कृष्णा यांना फोनवरुन दमदाटी केली. कर्तव्यदक्ष अधिकारी असलेल्या अंजना कृष्णा यांनी गावातील प्रकरणाचे गांभीर्य ओळखून कारवाई करण्यासंबंधी पावले उचलली. मात्र नेहमी कायद्यावर बोट ठेवणाऱ्या अजितदादांनी यावेळी मात्र कार्यकर्त्यांना वाचविण्याच्या नादात आयपीएस अधिकाऱ्याला 'एवढी हिम्मत आहे का तुमची?' असे म्हणून त्यांच्या कर्तव्यनिष्ठेवर शंका उपस्थित करून त्यांच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचवली. अजित पवार यांच्या व्हिडीओ कॉलची संपूर्ण देशात चर्चा असताना अमोल मिटकरी यांनी एक पाऊल पुढे टाकून थेट आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या जात प्रमाणपत्र विषयालाच हात घातला. एकप्रकारे त्यांनी अंजना कृष्णा यांच्यावर दबाव आणण्याचाच प्रयत्न केला. परंतु राष्ट्रीय पातळीवरील माध्यमांनीही अजित पवार यांना लक्ष्य केल्यानंतर या विषयावर पडदा टाकणे आवश्यक होते. प्रथमत: अजित पवार यांनी स्पष्टीकरण देऊन एक पाऊल मागे आले. त्यानंतर पक्षातून दबाव आल्यानंतर अमोल मिटकरी यांनाही दिलगिरी व्यक्त करावी लागली, असे सूत्रांनी सांगितले.

advertisement

ती माझी वैयक्तिक भूमिका, बिनशर्त दिलगिरी व्यक्त करतो

सोलापूर घटनेसंदर्भात केलेले ट्विट मी बिनशर्त मागे घेऊन दिलगिरी व्यक्त करतो, असे सांगतानाच ही माझ्या पक्षाची भूमिका नव्हती तर माझी वैयक्तिक भूमिका होती. आपले पोलीस दल आणि प्रामाणिकपणे सेवा करणाऱ्या अधिकाऱ्यांबद्दल मला सर्वोच्च आदर आहे. मी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या भूमिकेशी पूर्णपणे सहमत आहे, असे ट्विट अमोल मिटकरी यांनी केले. प्रकरण अंगलट आल्यानंतर मिटकरी यांनी आधीचे ट्विट मागे घेऊन बिनशर्त दिलगिरी व्यक्त केली.

advertisement

advertisement

परिविक्षाधीन अधिकारी अंजना कृष्णा यांच्या सरकारी कामात आणला म्हणून ग्राम महसूल अधिकारी प्रिती शिंदे यांच्या तक्रारीनंतर पोलीस हवालदार श्रीपती गोरे यांच्या तक्रारीनंतर २० जणांविरुद्ध पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ज्यांनी अजित पवार यांना फोन केला ते स्थानिक राष्ट्रवादीचे पदाधिकारी बाबासाहेब जगताप यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
IPS Anjana Krishna: ट्विट केले, अंगलट आले, दबाव आल्यावर बिनशर्त दिलगिरी, अमोल मिटकरींची कोलांटउडी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल