ही घटना काही क्षणातच पोलिसांत खळबळ उडवणारी ठरली. आरोपीने पोबारा करताच शहर पोलिस प्रशासन हादरले आणि तातडीने शोध मोहीम सुरू करण्यात आली. शहरातील प्रमुख
ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली तसेच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यात आला.
केवळ दोन तासांच्या आत पोलीस दलाने अत्यंत तत्परतेने काम करत आरोपीला बडनेरा परिसरातून अटक केली. सध्या आरोपीविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून त्याची चौकशी सुरू आहे.
advertisement
कोतवाली पोलीस ठाण्यातून आरोपीने पळ काढल्याने पोलिसांच्या पहाऱ्यावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आरोपीला योग्य देखरेख न दिल्यामुळे ही घटना घडली, अशी टीका होत आहे. याप्रकरणी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.
Location :
Amravati,Maharashtra
First Published :
July 13, 2025 10:06 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
बाथरुमला जायचंय सांगून पळाला, पोलिसांनी दोन तासांत बडनेऱ्यातून बेड्या ठोकल्या
