Bhaubij 2025 : भाऊबीजची शॉपिंग करताय? 350 रुपयांत मिळतायत ट्रेंडी 3-पीस कॉटन ड्रेस, हे आहे लोकेशन
- Published by:Mohan Najan
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
पारंपरिक कपड्यांसोबतच हलके, मऊ आणि स्टायलिश कॉटनचे थ्री-पीस सेट सध्या लोकप्रिय आहेत.
मुंबई: दिवाळी सुरू झाली की बाजारपेठांमध्ये खरेदीचा उत्साह वाढतो. यावर्षी दिवाळीनंतर लगेच लग्नसराईचा हंगाम सुरू होणार असल्याने मुली आणि महिलांचा कल ट्रेंडी आणि आरामदायी कपड्यांकडे जास्त वाढला आहे. पारंपरिक कपड्यांसोबतच हलके, मऊ आणि स्टायलिश कॉटनचे थ्री-पीस सेट सध्या लोकप्रिय आहेत.
मुंबईतील दादर मार्केटमध्ये अशाच ड्रेससाठी एक ठिकाण प्रसिद्ध ठरत आहे. रानडे रोडवरील विसावा हॉटेलच्या जवळ, पुरातन वटवृक्ष मंदिराच्या समोर, अर्पित कानडे नावाच्या तरुणाचा स्टॉल आहे. येथे 350 रुपयांपासून प्युअर जयपुरी कॉटनचे थ्री-पीस सेट उपलब्ध आहेत.
advertisement
सेटमध्ये कुर्ता, पॅन्ट आणि ओढणी आहे. तसंच या डिझाईन्समध्ये काही लोकप्रिय पॅटर्न अशी आहेत:
1) V-neck फुलांचा प्रिंट कुर्ता
2) राऊंड नेक डायमंड वर्क
3) आरी वर्क सरळ कट कुर्ता
4) मिरर वर्क डिझाईन
5) ब्लॉक प्रिंट डिझाईन
हे सर्व ड्रेस M, L, XL आणि XXL साईजमध्ये उपलब्ध आहेत. याच स्टॉलवर तुम्हाला रियान कॉटनचे टू-पीस कॉर्ड सेट सुद्धा मिळतात. हलके, मऊ आणि रोजच्या वापरासाठी योग्य असल्यामुळे या दिवाळीत किंवा लग्नसराईच्या तयारीसाठी हे ड्रेस उत्तम पर्याय ठरत आहेत. याच स्टॉलवर तुम्हाला रियान कॉटनचे टू-पीस कॉर्ड सेट सुद्धा मिळतात. हलके, मऊ आणि रोजच्या वापरासाठी योग्य असल्यामुळे या दिवाळीत किंवा लग्नसराईच्या तयारीसाठी हे ड्रेस उत्तम पर्याय ठरत आहेत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 22, 2025 12:21 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Bhaubij 2025 : भाऊबीजची शॉपिंग करताय? 350 रुपयांत मिळतायत ट्रेंडी 3-पीस कॉटन ड्रेस, हे आहे लोकेशन

