ठाण्यात 2 लाखांच्या iPhoneची चोरी, मानली नाही हार; मराठी अभिनेत्यानं 6 महिन्यात जिद्दीने उभारला लाखोंचा स्टुडिओ
- Published by:Minal Gurav
Last Updated:
प्रसिद्ध मराठी अभिनेत्यानं मोठ्या कष्टानं 2 लाखांचा आयफोन खरेदी केला होता जो चोरीला गेल्यानंतर त्याने हार मानता सहा महिन्यात असं काही करून दाखवलं आहे की सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
ठाण्यात मॉलच्या बाहेर मोबाईल चोरीला जाण्याच्या घटना मागच्या काही महिन्यात प्रचंड वाढल्या होत्या. प्रसिद्ध मराठी अभिनेता देखील याचा बळी ठरला. अभिनेत्याने मोठ्या कष्टाने घेतलेला 2 लाखांचा आयफोन चोरीला गेला. त्याने फोन शोधण्यासाठी प्रचंड कष्ट घेतले. पोलिसांची मदत घेतली मात्र फोन काही सापडला नाही. पण अभिनेत्याने हार न मानता त्याचं काम सुरू ठेवलं. यात अभिनेत्याचं 6 असं काही करून दाखवलं आहे की, ते पाहून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
संकेत कोर्लेकर असं अभिनेत्याचं नाव असून तो 'अजूनही बरसात आहे', 'लेक माझी दुर्गा', 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' सारख्या मालिकांमधून तो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 16 मार्चला तो ठाण्यात मीटिंगसाठी जात असताना विव्हियाना मॉलसमोरून दोन दुचाकीस्वारांनी त्याचा iPhone 16 Pro Max चोरी केला. संकेतनं पोलिसांची मदत घेतली. मात्र फोन अजूनही सापडला नाही. त्याने इतरांना देखील सतर्क राहण्याचं आवाहन केलं.
advertisement
संकेत हा अभिनेत्याबरोबरच युट्यूबर देखील आहे. युट्यूबरवर त्याला 7 मिलियन लोक फॉलो करतात. एक मोबाईल आणि स्टँड असा सेटअप घेऊन तो त्याचे व्हिडीओ करतो. मोठ्या कष्टाने त्याने आयफोन खरेदी केली होता. पण आयफोन केला म्हणून तो खचला नाही. त्याने प्रचंड मेहनत घेतली आणि सहा महिन्या त्याचा 8 लाखांचा सेटअप उभा केला आहे.
advertisement
दिवाळीच्या मुहूर्तावर संकेतनं खास व्हिडीओ पोस्ट करत ही माहिती त्याच्या चाहत्यांना दिली. संकेतनं व्हिडीओ शेअर करत त्यावर कॅप्शन लिहिलंय, "2 लाखांचा फोन गेला. हट्टाने 6 महिन्यात 8 लाखाचे सेटअप उभे केले."
advertisement
"16 मार्च 2025 ला माझा जवळपास 2 लाखांचा नवा कोरा फोन ठाण्यातल्या चोरांनी हिसकावून लुटला ज्याच्यावर मी व्हिडीओ बनवून तुमचे मनोरंजन करायचो. माझं पूर्ण सोशल मिडिया करिअर त्या फोनवर होतं म्हणून एवढे पैसे गुंतवले होते. एक रिंग लाईट आणि मोबाईल एवढेच काय ते माझे विश्व. फोनची आशा मी तेव्हाच सोडून दिली होती कारण माझा बाप मंत्री किंवा मोठा अधिकारी नाही. पण आयुष्य संघर्षात गेलेला मी नव्याने उभा राहिलो आणि स्वत:चा वेग वाढवला, दोन लाखांचा आयफोन गेला ह्या रागात 6 महिन्यात स्वत:चे आठ लाखांचे सेटअप आणि प्रॉडक्शन उभे केले कारण मला माझी वाईट वेळ देखील थांबवू शकत नाही."
advertisement
संकेतने व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, "ह्या दिवाळीला मी हट्टाने शुभं बनवले आहे. वाईट वेळेत हरलो नाही रडत बसलो नाही नशिबाला दोष दिला नाही.फक्त दिवस रात्र मेहनत केली आणि नियती कडून सहा महिन्यात हट्टाने त्याचे फळ मागून घेतले.. तुम्हा सर्वांच्या सपोर्ट मुळे खंबीर राहिलो पण वाईट वेळेपुढे झुकलो नाही. दिवस आपोआप बदलत नाहीत, घड्याळात वेळ नं बघता झगडून ते दिवस बदलावे लागतात. खरा प्रवास तर आता सुरू झालाय. शुभ दीपावली."
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 22, 2025 12:19 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
ठाण्यात 2 लाखांच्या iPhoneची चोरी, मानली नाही हार; मराठी अभिनेत्यानं 6 महिन्यात जिद्दीने उभारला लाखोंचा स्टुडिओ