MNS Diwali Dipotsav : आयजीच्या जीवावर बायजी उदार! शिवाजी पार्कवरील दीपोत्सवाचं श्रेय पर्यटन विभागाने लाटलं, मनसेची टीका

Last Updated:

MNS Mumbai Diwali Dipotsav : महाराष्ट्र पर्यटन विभागाने त्यांच्या एक्स हॅण्डलवरून, मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावरील 'दीपोत्सवाची' काही क्षणचित्र दाखवून पुढे हा अनुभव घ्यायला या असं मुंबई आणि मुंबई बाहेरील पर्यटकांना असं आवाहन केलं आहे

MNS Mumbai Diwali Dipotsav
MNS Mumbai Diwali Dipotsav
MNS Diwali Dipotsav Mumbai : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले असतानाच राजकीय वर्तुळात अनेक रंग पहायला मिळतात. अशातच यंदाच्या निवडणुकीत दोन्ही ठाकरे भाऊ एकत्र येणार आहेत. मनसेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईतील शिवाजी पार्कवर दीपोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. मात्र, यावर्षी दीपोत्सव सोहळा काहीसा वेगळा पहायला मिळाला. दीपोत्सावाला यंदा राजकीय रंग पहायला मिळतोय. मनसेच्या या दीपोत्सवाचं श्रेय सरकारच्या पर्यटन विभागाने घेतल्याचं दिसून आलं होतं. त्यावर आता मनसेने खरमरीत टीका केलीये.

गेली 13 वर्ष आमचा उद्देश फक्त...

महाराष्ट्र पर्यटन विभागाने त्यांच्या एक्स हॅण्डलवरून, मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावरील 'दीपोत्सवाची' काही क्षणचित्र दाखवून पुढे हा अनुभव घ्यायला या असं मुंबई आणि मुंबई बाहेरील पर्यटकांना असं आवाहन केलं आहे. दिवाळी हा हिंदूंचा सगळ्यात मोठा सण आणि या सणाच्या निमित्ताने गेली 13 वर्ष दीपोत्सव हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवाजी पार्क मैदानावर करत आहे. हा दीपोत्सव जरी महाराष्ट्र नवनिर्माण सेना करत असली तरी तो पूर्ण अराजकीय राहील हे आम्ही पाहिलं आणि आमचा उद्देश फक्त आणि फक्त लोकांना आनंद मिळावा हाच आहे आणि राहील, असं मनसेच्या ट्विटर हँडलवर म्हटलं आहे.
advertisement

छोटंसं श्रेय दिलं असतं तरी...

पण जेव्हा महाराष्ट्र सरकारचा एक विभाग या दीपोत्सवाचं मार्केटिंग हे स्वतः हा विभाग करत असल्यासारखं जेव्हा दाखवतं तेंव्हा विशेष आश्चर्य वाटलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला याचं अगदी छोटंसं श्रेय दिलं असतं तर निश्चित आम्हाला आनंद झाला असता आणि सरकारच्या मनाचा उमदेपणा दिसला असता. नाशिकमध्ये सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जे केलं ते पुढे तत्कालीन सरकारनेच केलं अशी जाहिरातबाजी झाली. असो.. पण तुमचे नेते ते आमचे नेते, तुमचा पक्ष आमचा पक्ष अशी कार्यपद्धती सत्ताधारी पक्षाची आहे हे दिसतंच आहे. पण आता दुसऱ्यांचे चांगले कार्यक्रम सुद्धा आपलेच आहेत हे दाखवण्यापर्यंत सरकार जाईल असे वाटले नव्हते, अशी टीका मनसेने केली आहे.
advertisement
advertisement

मोह होईल इतके ते छान करू 

आम्ही मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने एक अभिजात कार्यक्रम यावर्षी केला, दीपोत्सव तर असतोच, असे सामान्यांना आनंद देणारे अनेक उपक्रम आम्ही करत राहणार आहोतच. त्यावेळी देखील पर्यटन विभागाला ते आमचे आहेत म्हणण्याचा मोह होईल इतके ते छान करूच, फक्त त्यावेळेस त्याचं श्रेय आमच्या पक्षाला जरूर द्या म्हणजे झालं, असं म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सरकारवर निशाणा साधला आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
MNS Diwali Dipotsav : आयजीच्या जीवावर बायजी उदार! शिवाजी पार्कवरील दीपोत्सवाचं श्रेय पर्यटन विभागाने लाटलं, मनसेची टीका
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement