कापसाची कंठी बनविण्यासाठी लागणारे साहित्य
मेडिकेअरसाठी वापरतात तो कापूस, फेविकॉलचे पाणी, टिकली आणि लेस हे साहित्य लागेल.
कापसाची कंठी कशी बनवायची?
सर्वात आधी कापसाचे तीन भाग करून घ्यायचे आहेत. आपल्याला कंठी कोणत्या साईजची पाहिजे त्या आकाराचे कापसाचे तीन भाग करून घ्या. त्यानंतर त्यातील एक एक भाग घेऊन त्याचे वस्त्र बनवून घ्यायचे आहे. वस्त्र बनविण्यासाठी फेविकॉलचे पाणी वापरायचे आहे. त्यामुळे माळ तुटणार नाही.
advertisement
वस्त्र बनवून झाल्यानंतर त्याची कंठी तयार करायची आहे. आपण केसांची वेणी गुंफतो तशी वेणी गुंफून घ्यायची आहे. वेणी गुंफली की त्याचे फुल तयार होत जाईल. सर्वच वस्त्रांचे फुल तयार करून घ्यायचे आहे. त्यानंतर त्यावर फुलांच्या मधोमध टिकली लावायची आहे. त्यात तुम्ही कुंकू सुद्धा लावू शकता. तसेच फेविकॉलच्या पाण्यात देखील कलर टाकून घेऊ शकता.
संपूर्ण फुलांवर टिकली लावून झाल्यानंतर त्याला लेस लावून घ्यायची आहे. लेसऐवजी तुम्ही पूजेचा धागा देखील वापरू शकता. तसेच डिझाईनसाठी आणखी साहित्य सुद्धा त्यात घेऊ शकता. त्यानंतर कापसाची कंठी तयार झाली असेल. अशाप्रकारे तुम्ही लाडक्या बाप्पासाठी घरच्या घरी कापसाची कंठी बनवू शकता.