Ganpati Chaturthi 2025 : यंदाच्या गणेश चतुर्थीला दुर्मिळ शुभ योग, बाप्पाची प्राण प्रतिष्ठापना मुहूर्त काय? Video
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
- Published by:Mohan Najan
Last Updated:
Ganpati Chaturthi 2025 : यंदाची गणेश चतुर्थी अनेक दिव्य योगांमुळे महत्त्वाची मानली जात आहे. पारंपरिक ज्योतिषशास्त्रानुसार अनेक दुर्मिळ शुभ योगात गणेशोत्सवाची सुरुवात होत आहे.
नाशिक: 27 ऑगस्टपासून 10 दिवसांचा गणेश उत्सव सगळीकडे साजरा होणार आहे. त्याच अनुषंगाने यंदाची गणेश चतुर्थी अनेक दिव्य योगांमुळे महत्त्वाची मानली जात आहे. पारंपरिक ज्योतिषशास्त्रानुसार अनेक दुर्मिळ शुभ योगात गणेशोत्सवाची सुरुवात होत आहे. यामध्ये सर्वार्थ सिद्धी योग, रविराजयोग, प्रीति योग, इंद्रभद्रयोग आणि ब्रह्मायोग यांचा समावेश आहे. तसेच महालक्ष्मी योग, महाभाग्य योगही जुळून येत आहेत. तर यंदा गणेश चतुर्थीला गणेश स्थापना कधी करावी? याबद्दल नाशिक येथील पुजारी समीर जोशी यांनी माहिती दिली आहे.
असा आहे श्री गणेश स्थापनेचा मुहूर्त
ज्योतिष शास्त्रानुसार श्रीगणपती बाप्पाच्या पूजेचा अत्यंत शुभ मुहूर्त दिनांक 27 ऑगस्ट 2025 बुधवार, सकाळी 11:05 वाजेपासून ते दुपारी 01:40 वाजेपर्यंत असणार आहे. त्याचबरोबर चंद्रास्तकाल: शुभ योग बुधवार दिनांक 27 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 09 वाजून 27 मिनिटांनी देखील आहे. तरी गणेश मूर्ती स्थापन ही सकाळी सूर्योदयापासून ते संध्याकाळी सूर्यास्ताच्या आधी केली तर अतिशय उत्तम असणार आहे. हे सर्वांनी लक्षात घ्यावे, असे समीर जोशी यांनी सांगितले आहे.
advertisement
शास्त्रानुसार कोणत्या स्वरूपातील मूर्तीची स्थापना करावी?
धर्म शास्त्रात ज्या मूर्तीची विटंबना होणार नाही अशा मूर्तीची स्थापना करण्याचे सांगितले आहे. मोठ्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा योग्य पद्धतीने केली जात नसते. यामुळे मंडळाच्या मूर्तीसमोर छोट्या स्वरूपातील प्रती मूर्ती पूजावी. तसेच धातूची मूर्ती पूजली तर अतिशय योग्य असते. त्याच पद्धतीने ज्या मूर्तीचे विसर्जन लागलीच होईल तिची काही दुर्दशा होणार नाही याकरता शाळू मातीच्या मूर्तीला प्राधान्य द्यावे.
advertisement
गणपती प्राण प्रतिष्ठापना करताना कोणता मंत्र म्हणावा?
गणपतीची प्राणप्रतिष्ठा करतानी ॐ भूर्भुवः स्वः गणेशाम्बिकाभ्यां नमः, सुप्रतिष्ठितो भव, प्रसन्नो भव, वरदा भव। या मंत्राचं पठण करा. मंत्र पठण करताना आसनासाठी भगवान गणेशाला पाच फुले अर्पण करा, असं समीर जोशी सांगतात.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
Aug 26, 2025 5:47 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Ganpati Chaturthi 2025 : यंदाच्या गणेश चतुर्थीला दुर्मिळ शुभ योग, बाप्पाची प्राण प्रतिष्ठापना मुहूर्त काय? Video








