थंडीमुळे बामचा वापर जास्त करताय? तर आताच थांबवा ही सवय, नाहीतर होईल हा त्रास
- Reported by:Pragati Bahurupi
- Published by:Mohan Najan
Last Updated:
स्वस्त, सहज उपलब्ध आणि झटपट आराम देणारा उपाय म्हणून बामकडे पाहिले जाते. मात्र, दररोज आणि अति वापर केल्यास त्याचे काही दुष्परिणामही होऊ शकतात.
अमरावती : थंडीच्या दिवसांत अंगदुखी, डोकेदुखी, सर्दी-खोकला आणि स्नायूंमध्ये त्रास होण्याच्या तक्रारी वाढतात. या पार्श्वभूमीवर बामचा वापर लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत मोठ्या प्रमाणात केला जातो. स्वस्त, सहज उपलब्ध आणि झटपट आराम देणारा उपाय म्हणून बामकडे पाहिले जाते. मात्र, दररोज आणि अति वापर केल्यास त्याचे काही दुष्परिणामही होऊ शकतात. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊ.
हिवाळ्यात बामचा वापर का वाढतो?
थंडीमुळे स्नायूंमध्ये वेदना व अंगदुखी वाढते. सर्दी, नाक बंद होणे, डोके जड वाटणे. थंड हवेमुळे सांधेदुखी व पाठदुखीचा त्रास होणे. रात्री झोप न लागणे किंवा डोकेदुखी या त्रासांवर घरगुती उपाय म्हणून बामचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.
advertisement
दररोज बाम लावण्याचे फायदे
1. बाममध्ये असलेले मेंथॉल, कापूर, युकॅलिप्टस तेल यामुळे स्नायू व सांधेदुखीवर तात्काळ आराम मिळतो.
2. कपाळावर किंवा मानेवर थोड्या प्रमाणात बाम लावल्यास ताण कमी होऊन डोकेदुखी कमी होते.
3. छाती किंवा नाकाजवळ बाम लावल्यास श्वास घेणे सुलभ होते.
4. हिवाळ्यात शरीर सुस्त वाटत असल्यास बाममुळे उबदारपणा जाणवतो.
advertisement
दररोज बाम वापरण्याचे संभाव्य तोटे
1. त्वचेवर जळजळ व ॲलर्जी होणे. अति वापरामुळे त्वचा लाल होणे, खाज सुटणे किंवा जळजळ होऊ शकते. विशेषतः संवेदनशील त्वचेमध्ये या समस्या जास्त प्रमाणात आढळतात.
2. त्वचा कोरडी होण्याचा धोका असतो. काही बाममधील रसायनांमुळे त्वचेतील ओलावा कमी होतो.
3. तसेच सवय लागण्याची शक्यता असते. डोकेदुखी किंवा अंगदुखी झाली की लगेच बाम लावण्याची मानसिक सवय लागू शकते.
advertisement
4. लहान मुलांसाठी धोकादायक ठरू शकते. जास्त प्रमाणात किंवा चुकीच्या पद्धतीने वापर केल्यास लहान मुलांना श्वसनाचा त्रास होऊ शकतो.
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, बाम लावल्याने मूळ कारणावर उपचार होत नाही. बाम तात्पुरता आराम देतो, मात्र वेदनेचे मूळ कारण तसेच राहते. बामचा वापर मर्यादित आणि गरजेपुरताच करावा. जखम, डोळे किंवा नाकाच्या आत बाम लावू नये. दीर्घकाळ वेदना असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. लहान मुलांवर बाम वापरण्याआधी विशेष काळजी घ्यावी.
Location :
Amravati,Maharashtra
First Published :
Jan 21, 2026 4:06 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
थंडीमुळे बामचा वापर जास्त करताय? तर आताच थांबवा ही सवय, नाहीतर होईल हा त्रास









