अमरावती - अमरावतीला आलात तर मग अमरावती स्पेशल डिश गिला वडा नक्की ट्राय करून बघा, असे अमरावतीमध्ये येणाऱ्या प्रत्येकाला अमरावती वासियांकडून सांगितले जाते. गिला वडा अमरावतीशिवाय कुठेही मिळत नाही, हे सुद्धा व्यावसायिक मोठ्या अभिमानाने सांगतात. मग हा गिला वडा आहे तरी नेमका कसा? त्याची रेसिपी काय? ते आज आपण जाणून घेऊया.
advertisement
गिला वडा हा अमरावतीमधील स्पेशल पदार्थ आहे, जो अमरावतीशिवाय तुम्हाला कुठेही मिळणार नाही. 1995 पासून हा पदार्थ अमरावतीमध्ये बनवला जात आहे. 25 हजारांपेक्षा जास्त लोकं बुंदेलखंडहून अमरावतीमध्ये स्थायिक झाले. बुंदेलखंड येथील लोकं लग्न समारंभाच्या वेळी कुलदैवतांना गिला वड्याचा नैवेद्य द्यायचे. नंतर त्याचा व्यवसाय सुरू करण्यात आला. उडदाच्या डाळीपासून तयार होणारा हा पदार्थ हेल्दी आणि टेस्टी आहे.
नाकाला जीभ लावूनच दाखवली! पुण्यातील 76 वर्षांच्या आजोबांची गिनीज बुकात नोंद, VIDEO
मनिष उपाध्याय यांनी याची रेसिपी सांगितली. अमरावतीमधील जवाहर गेटच्या आत सक्करसाथ चौक येथे विष्णू दहीवडा नावाचे मनिष उपाध्याय यांचे दुकान आहे. हे दुकान अमरावतीमधील गिला वडा साठी खूप फेमस आहे. 1995 पासून ते हा व्यवसाय करत आहे. मनिष उपाध्याय यांची आई मिना उपाध्याय यांनी हे दुकान सुरू केले होते. तेव्हापासून ते आतापर्यंत अजूनही हे दुकान सुरू आहे. जेव्हा यांनी दुकान हा व्यवसाय तेव्हा 5 रुपयाला हा गिला वडा मिळत होता.
पिस्त्यापासून साकारली बाप्पाची मूर्ती, विलोभनीय दृश्य, सांगलीतील तरुणांचा अनोखा उपक्रम, VIDEO
उडदाची डाळ रात्रभर भिजत घालायची. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ती डाळ मिक्सरमधून काढून घ्यायची. त्यानंतर एका कापडावर त्याचे वडे थापून ते तळून घ्यायचे. तयार झालेले वडे मिठाच्या पाण्यात ओले करून घ्यायचे. त्यानंतर त्यावर चटणी घालून गिला वडा खाण्यासाठी तयार आहेत. आता त्यांची किंमत 35 रुपये प्लेट आहे. तर मग अमरावतीला आलात तर गिला वडा नक्की ट्राय करू शकता.