नाकाला जीभ लावूनच दाखवली! पुण्यातील 76 वर्षांच्या आजोबांची गिनीज बुकात नोंद, VIDEO

Last Updated:

कसब्यातील शिंपी आळीतील सोपान ऊर्फ काका भूमकर या आजोबांनी तब्बल एक तास ३ मिनिटे ३९ सेकंद नाकाला जीभ लावून रेकॉर्ड केले आहे.

+
भूमकर

भूमकर काका

प्राची केदारी, प्रतिनिधी
पुणे : वय हा खरोखरच फक्त एक नंबर आहे. तुम्हाला हवे ते करण्याची आवड आणि जिद्द असेल तुम्ही ते नक्की करू शकता. याचे उत्तम उदाहरण म्हणजे भूमकर काका. पुण्यातील कसबा पेठेतील भूमकर काका यांनी 76 व्या वर्षी आपल नाव जागतिक स्तरावर नेऊन पोहोचवले आहे.
या आजोबांनी चक्क नाकाला जीभ लावण्याचा अनोखा जागतिक विक्रम केला आहे. त्यांची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. याचबाबतचा हा विशेष आढावा.
advertisement
कसब्यातील शिंपी आळीतील सोपान ऊर्फ काका भूमकर या आजोबांनी तब्बल एक तास 3 मिनिटे 39 सेकंद नाकाला जीभ लावून रेकॉर्ड केले आहेत. एक दिवशी त्यांनी पेपर वाचला आणि एका 13 वर्षांच्या मुलीने 51 मिनिट नाकाला जीभ लावून रेकॉर्ड केलेले वाचले आणि सहज विचार आला की, आपणही हे करू शकतो. यासाठी काही सराव न करता त्याचदिवशी त्यांनी हे 30 मिनिटे करुन पाहिले.
advertisement
त्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे 5 ते 6.30 पर्यंत 90 मिनिट करुन मुलगा हर्षलला सांगितल्यानंतर नात, मुलगा दोघांनी ते मोबाईलमध्ये रेकॉर्ड केले. तो व्हिडिओ इंटरनॅशनल रेकॉर्डसाठी पाठवला. या प्रकारात माझ्या आधी 52 मिनिटांचा रेकॉर्ड होता. तो मी मोडला, असे त्यांनी सांगितले.
advertisement
Pune News : एक वही एक पेन उपक्रमाची सर्वत्र चर्चा, पुण्यातील हा उपक्रम नेमका आहे तरी काय?
पुढे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करायचा होता. मात्र, अचानक पॅरालेसिसचा अटॅक आला. त्यामुळे दोन महिने थांबलो. यानंतर 1 तास 3 मिनिटे बसून हे रेकॉर्ड केले. त्याचा व्हिडिओ मुलाने आणि नातीने पुढे पाठवत त्यांची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली.
advertisement
अगदी सहजपणे हा विक्रम केला आहे. हे सर्व करत असताना कुठलाही त्रास झाला नाही. मला पूर्वीपासूनच व्यायाम आणि कॅरम खेळाची आवड आहे. माझ्या मनात हे करण्याची इच्छाशक्ती होती, त्यामुळेच हे शक्य झाले, अशी प्रतिक्रिया सोपान भूमकर यांनी लोकल18 शी बोलताना दिली.
मराठी बातम्या/पुणे/
नाकाला जीभ लावूनच दाखवली! पुण्यातील 76 वर्षांच्या आजोबांची गिनीज बुकात नोंद, VIDEO
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement