TRENDING:

मानवतेचा संदेश देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, जाणून घ्या गुरूकुंज आश्रम आणि समाधी विषयी

Last Updated:

सर्वांना मानवतेचा संदेश देणारे, अंधश्रद्धा निर्मुलनासाठी अथक प्रयत्न करणारे वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. महाराजांनी समाजात अनेक गोष्टींमध्ये बदल घडवून आणले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
प्रगती बहुरुपी, प्रतिनिधी
advertisement

अमरावती : सर्वांना मानवतेचा संदेश देणारे, अंधश्रद्धा निर्मुलनासाठी अथक प्रयत्न करणारे वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. महाराजांनी समाजात अनेक गोष्टींमध्ये बदल घडवून आणले. समाजातील प्रत्येक व्यक्तीचा विचार करून त्यांनी कार्य केले. अशा महामानवाचा जन्म अमरावती जिल्ह्यातील यावली या गावात झाला. तसेच त्यांनी अमरावतीमधील मोझरी येथे गुरूकुंज आश्रमाची स्थापना केली. राष्ट्रसंतांची समाधी सुद्धा या ठिकाणी आहे. मोझरी हे गाव अमरावती वरून 35 किमी अंतरावर आहे. तिवसा मोझरी असेही त्या गावाला ओळखले जाते .

advertisement

अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दन बोथे यांनी लोकल 18शी बोलतांना या बद्दलच माहिती दिली. ते सांगतात की, आता सद्या 15 ऑक्टोबरपासून 21 ऑक्टोबरपर्यंत मोझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा 56 वा पुण्यतिथी महोत्सव सुरू आहे. याठिकाणी दरवर्षी लाखो लोकं येतात. मागील वर्षी 7 लाख लोकं येथे आले होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे प्रार्थना मंदिर येथे आहे. त्या ठिकाणी कोणतीही मूर्ती तुम्हाला दिसणार नाही. त्याचबरोबर तुकडोजी महाराजांची समाधी सुद्धा याच ठिकाणी आहे. या ठिकाणी कोणतीही अंधश्रद्धा पाळली जात नाही, असेही त्यांनी सांगितले.

advertisement

घाम फोडणारी बातमी! मागील 10 वर्षात हॉस्पिटल, औषधोपचारावर होणारा खर्च 10 पटीने वाढला, कारणं काय?

11 ऑक्टोबर 1968 मध्ये महाराजांचे कर्करोगामुळे निधन झाले आणि त्यांची समाधी गुरूकुंज आश्रमासमोर बांधली आहे. तिथे फक्त त्यांचे स्मारक आहे. कुठलीही मूर्ती तिथे ठेवलेली नाही. महाराजांनी त्यांचे शेवटचे दिवस येथे घालवले आहे. आजही त्यांनी दिलेल्या मानवतेचा संदेश त्यांचे सर्व सेवेकरी लक्षात ठेवून काम करतात.

advertisement

पुढे ते सांगतात की, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी गुरुदेव मासिक सुरू केले होते, ते अजूनही येथे सुरू आहे. राष्ट्रसंतांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार या ठिकाणाहून सुरू आहे. तसेच वृद्धाश्रम आणि अनाथ आश्रम सुद्धा येथे आहे. अन्नदान विभागातून सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था सुद्धा येथे केली जाते. अन्नदान विभाग पूर्णतः लोकवर्गणीतून चालतो. त्याचबरोबर ग्रामगीता जिवनविकास परीक्षा विभाग सुद्धा इथे आहे. यामाध्यमातून विविध परीक्षा घेतल्या जातात. तसेच त्याचे पारितोषिक सुद्धा दिले जाते, ही सर्व माहिती तेथील अधिकाऱ्यांनी दिली.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/अमरावती/
मानवतेचा संदेश देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, जाणून घ्या गुरूकुंज आश्रम आणि समाधी विषयी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल