घाम फोडणारी बातमी! मागील 10 वर्षात हॉस्पिटल, औषधोपचारावर होणारा खर्च 10 पटीने वाढला, कारणं काय?

Last Updated:

hospital expenditure increased - उपचारांवर होणारा खर्च सध्या 14 टक्के आहे. हा खर्च वाढण्याची प्रमुख कारणे काय आहेत, हेच आपण आज जाणून घेणार आहोत. पुण्यातील डॉ. अविनाश भोंडवे यांनी याबाबतची माहिती दिली.

+
प्रतिकात्मक

प्रतिकात्मक फोटो

प्राची केदारी, प्रतिनिधी
पुणे : भारतात हॉस्पिटल दाखल होण्याचा खर्च अनेक पटीने वाढत आहे. विमा कंपनी 'ॲको'ने जारी केलेल्या 'इंडिया हेल्थ रिपोर्ट'मध्ये म्हटले आहे की, आर्थिक वर्ष 2023-24 साठी सरासरी आरोग्य विमा 11.35 टक्के वाढून 70 हजार 558 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. तर गेल्या वर्षी तो 62 हजार 548 रुपये होता. तसेच उपचारांवर होणारा खर्च सध्या 14 टक्के आहे. हा खर्च वाढण्याची प्रमुख कारणे काय आहेत, हेच आपण आज जाणून घेणार आहोत.
advertisement
पुण्यातील डॉ. अविनाश भोंडवे यांनी याबाबतची माहिती दिली. लोकल18 शी बोलताना ते म्हणाले की, भारतामध्ये औषधोपचाराचा आणि हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर रुग्णावर होणारा खर्च मागील 10 वर्षात दुपटीने वाढला आहे. याची मुख्य कारणे पाहिली तर यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर, सरकारी कर, वाढती महागाई ही कारणे आहेत.
वीज ही 24 तास लागते. उपकरणांसाठी लागणारी वीज ही मोठ्या प्रमाणात असते. त्याचप्रमाणे प्रत्येक हॉस्पिटलला महापालिकेच्या नियमानुसार तसेच नुकत्याच आलेल्या सरकारी नियमाप्रमाणे काही ठराविक कर्मचारी हे क्वालिफाईड ठेवावे लागतात. त्याप्रमाणे त्यांचे पगार हे वाढवत जावे लागतात. सरकारच्या नियमानुसार प्रशिक्षित कर्मचारी संख्या वाढवत असल्यानेही हा खर्च वाढत जात आहे, असे ते म्हणाले.
advertisement
बालविवाह रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने नेमके काय उपाय केले जातात, संपर्ण माहिती
हॉस्पिटलला जो जैविक कचरा गोळा करून द्यावा लागतो, त्यासाठीचे दर हे कोरोनानंतर खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. हॉस्पिटलला लागणारी उपकरणे ही सर्व आयात करावी लागतात. जसे की, सीटी स्कॅन, रोबोटीक सर्जरी ही उपकरणे परदेशातून आयात होतात. त्यावर कुठले अनुदानही मिळत नाही. तर रुग्णाच्या सोयीसाठी काही सुविधेसाठी पूरवाव्या लागतात. हे वाढलेले खर्च डॉक्टरांनी वाढवलेल्या फीमुळे नाही तर इन्फ्रास्ट्रक्चर, सरकारी कर आणि इतर गोष्टींमुळे त्या वाढत गेल्या आहेत, अशी माहिती डॉ. अविनाश भोंडवे यांनी दिली आहे.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
घाम फोडणारी बातमी! मागील 10 वर्षात हॉस्पिटल, औषधोपचारावर होणारा खर्च 10 पटीने वाढला, कारणं काय?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement